CSK vs KKR Cricket News  Dainik Gomantak
क्रीडा

CSK vs KKR, IPL 2022: केकेआरची यंग ब्रिगेड, सीएसकेच्या 'अनुभवा'वर पडणार का भारी

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR, IPL 2022) विरुद्ध होणार आहे.

दैनिक गोमन्तक

क्रिकेटचा सण पुन्हा एकदा आलाय, चौकार- षटकारांचा पाऊस आणि नवीन टॅलेंट पाहण्यासाठी सज्ज व्हा. आता IPL (IPL 2022) सुरु होण्यासाठी अवघे काही तासच उरले आहेत. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR, IPL 2022) विरुद्ध होणार आहे. गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तेव्हा चेन्नईने चौथ्यांदा एकतर्फी लढतीत विजेतेपद पटकावले होते. आता आयपीएल 2022 च्या हंगामाची सुरुवात होत आहे. चेन्नई आणि कोलकाता यांच्यात (CSK vs KKR, IPL 2022) चुरशीची स्पर्धा होणार हे मात्र नक्की. कारण दोन्ही संघात एकमेकांच्या तोडीस तोड खेळाडू आहेत. चेन्नई सुपर किंग्जकडे अनुभवी खेळाडूंची फौज आहे. पुढच्या संघावर दबाव कसा निर्माण करायचा हे त्यांना चांगलच माहिती आहे. (CSK vs KKR IPL 2022 Kolkata Knight Riders record in the first match is better than Chennai Super Kings)

दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) श्रेयस अय्यरसारख्या (Shreyas Iyer) युवा कर्णधाराच्या भरवशावर मैदानात उतरणार आहे. ज्याचा संघ युवा खेळाडूंनी ओतपोत भरलेला आहे. अशा स्थितीत पहिला सामना कोण जिंकणार, असा प्रश्न क्रिकेट चांहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. या हंगामातील पहिला विजय चेन्नई सुपर किंग्जच्या वाट्याला येणार की कोलकाताच्या वाट्याला जाणार ? चला तर मग या प्रश्नाचे उत्तर एका डेटाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करुया. जो सर्वांना चकित करणारा आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी आयपीएलमधील त्यांच्या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी केली ते जाणून घ्या. (CSK vs KKR Cricket News)

पहिल्या सामन्यात चेन्नईचा खराब रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले असले तरी पहिल्या सामन्यातील त्यांचा विक्रम काही खास नाही. चेन्नईने आतापर्यंत 12 वेळा आयपीएलचे पहिले सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 जिंकले असून 6 गमावले आहेत. म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जचा विक्रम 50 टक्के विजयाचा आहे. तर दुसरीकडे, केकेआरने सुरुवातीचे 14 पैकी 10 सामने जिंकले आहेत. अर्थातच पहिला सामना जिंकण्यात केकेआरचे पारडे सीएसकेपेक्षा जड आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या शेवटच्या पाच पहिल्या सामन्यांपैकी 4 जिंकले आहेत. फक्त एकाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) त्यांना हा पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे चेन्नईला वानखेडे स्टेडियमवरच पराभवाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल 2022 चा पहिला सामना वानखेडेवरच होणार आहे.

पहिल्या सामन्यात केकेआरची शानदार कामगिरी

KKR ने आतापर्यंत IPL मध्ये त्यांचे 10 सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. 2013 ते 2019 पर्यंत त्यांनी पहिले सामने सलग 7 वेळा जिंकले आहेत. 2020 मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्यांना 49 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच, याआधी, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई आणि केकेआर यांच्यात फक्त एकदाच टक्कर झाली होती, जी मेन इन यलोने 2 धावांनी जिंकली होती. हा सामना 2011 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

SCROLL FOR NEXT