IPL 2022: जोस बटलर की जुबानी...या दोन फिरकीपटूंना मानले सर्वोत्तम 'फिरकीपटू'

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) शनिवारपासून सुरु होत आहे.
 Jos Buttler
Jos ButtlerDainik Gomantak

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग शनिवारपासून सुरु होत आहे. याच पाश्वशभूमीवर राजस्थान रॉयल्सचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने बुधवारी सांगितले की, 'आयपीएल मध्ये जेतेपद मिळविण्यासाठी आमचा संघ गेल्या 13 वर्षांपासून वाट पाहत आहे. 2008 मध्ये पहिल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल्सने जेतेपद पटकावले होते. परंतु त्यानंतर संघाला ही कामगिरी करता आली नाही.' राजस्थानने संजू सॅमसन (Sanju Samson) आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह IPL 2022 साठी बटलरलाही संघात कायम ठेवले आहे. (Ravichandran Ashwin and Yuzvendra Chahal are two of the best spinners in the world, says Jos Buttler)

बटलर म्हणाला, "यावर्षी संघाला आम्ही जेतेपद मिळवून देणार आहोत. आपल्या ओळखीच्या संघासह नवीन हंगाम सुरु करणे, त्याचबरोबर एक नवीन संघ तयार करुन जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. आयपीएल जिंकणे हे आमचे अंतिम लक्ष्य असणार आहे. त्यामध्ये योगदान देण्यासाठी मी थांबू शकत नाही."

 Jos Buttler
IPL 2022: लखनऊ संघाला Mark Wood ची मिळाली रिप्लेसमेंट, हॅट्ट्रिक घेणाऱ्याची एन्ट्री

बटलर पुढे म्हणाला, “आमच्या संघात अनेक महान खेळाडू आहेत. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हे जगातील दोन सर्वोत्तम फिरकीपटू आहेत. आमच्याकडे वेगवान गोलंदाजी खूप चांगली आहे. याशिवाय आमच्याकडे खूप चांगले फलंदाजही आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूंचेही चांगले पर्याय आहेत. त्यामुळे मला वाटते की, आमच्यासाठी ही आयपीएल खरोखरच रोमांचक असणार आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com