सीएसकेच्या (CSK) एका अधिकाऱ्याने खुलासा केला की, रिटेन्शन फ्रँचायझीचे कार्ड कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) कायम ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे. Twitter/Chennai Super Kings - Mask PFace with medical maskdu Whistle PPartying facedu!/ @ChennaiIPL
क्रीडा

IPL 2022 च्या लिलावातील पहिले 'रिटेन कार्ड' CSK धोनीसाठीच वापरणार

चाहत्यांच्या मनात धोनी (MS Dhoni) यलोमध्ये कायम राहणार की नाही याबद्दल शंका होत्या. कारण पुढील आयपीएलसाठी (IPL) सर्व संघांची लिलाव प्रक्रिया पुन्हा होणार आहे. तसेच 2022 आयपीएलमध्ये दोन नवीन संघ देखील सामिल होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

सीएसकेच्या (CSK) एका अधिकाऱ्याने खुलासा केला आहे की, आगामी आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावातील पहिले रिटेन्शन फ्रँचायझीचे कार्ड कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) कायम ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे.

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 27 धावांनी विजय मिळवत आयपीएलचे चौथे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, आयपीएल 2020 मध्ये प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ चेन्नईचा होता. परंतू एमएस धोनीच्या CSK संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन करत आयपीएलचे चौथे जेतेपद पटकाविले आहे.

चाहत्यांच्या मनात धोनी यलोमध्ये कायम राहणार की नाही याबद्दल शंका होत्या. कारण पुढील आयपीएलसाठी सर्व संघांची लिलाव प्रक्रिया पुन्हा होणार आहे. तसेच 2022 आयपीएलमध्ये दोन नवीन संघ देखील सामिल होणार आहेत. सीएसके अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, अनुभवी यष्टीरक्षक आयपीएल 2022 साठी सीएसकेमध्ये परत येईल.

एएनआयशी बोलताना सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, CSK ला कर्णधाराची गरज आहे, त्यामुळे खात्री बाळगा की धोनी पुढच्या वर्षी परत येईल. ती एक वस्तुस्थिती आहे. खेळाडूंना कायम ठेवण्याची संख्या आम्हाला अद्याप माहित नाही. परंतु प्रामाणिकपणे, एमएसच्या बाबतीत ते दुय्यम आहे. कारण पहिले कार्ड असेल ते त्याच्यासाठी वापरले जाईल.

क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेने धोनीला सामन्यानंतरच्या मुलाखतीत हाच प्रश्न विचारला होता. धोनीने सुरुवातीला सरळ उत्तर दिले नाही. तो म्हणाला, सीएसके संघ व्यवस्थापन पुढील 10 वर्षे डोळ्यासमोर ठेवून कोअर ग्रुप तयार करू शकतो की नाही हे ठरवण्याची गरज आहे. हर्षा भोगले यांनी धोनीचे CSK मध्ये मागे सोडत असलेल्या महान वारशाबद्दल अभिनंदन केले त्यावेळी, "तरीही मी मागे राहिलो नाही" असे उत्तर देताना एमएसडीने एक गालातल्या गालात स्मितहास्य देखील केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT