Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Video: धोनी स्टंपजवळ येताच फसली हिटमॅनची योजना! झिरोवर आऊट होत नकोशा लिस्टमध्ये केलं टॉप

Pranali Kodre

Rohit Sharma dismissed for a duck: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (6 मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रमही झाला आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. मात्र, यावेळी मुंबईने वेगळी योजना आखली. कर्णधार रोहित ऐवजी ईशान किशनसह मुंबईने कॅमेरॉन ग्रीनला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले.

मात्र, प्रथमदर्शनी मुंबईची ही योजना अयशस्वी ठरल्याचे दिसले. कारण कॅमेकॉन ग्रीन दुसऱ्याच षटकात 6 धावा करून माघारी परतला. त्यामुळे रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पण त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दीपक चाहरने ईशान किशनला 7 धावांवर बाद केले. याच षटकात पाचव्या चेंडूवर रोहित बाद झाला.

महत्त्वाचे म्हणजे पॉवरप्ले असतानाही दीपक चाहरच्या गोलंदाजीवेळी यष्टीरक्षण करणारा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी स्टंपजवळ येऊन थांबला. त्याने अशाप्रकारे क्षेत्ररक्षण लावले होते की रोहित सहज लॅप शॉट खेळू शकले. रोहितही या जाळ्यात फसला आणि लॅप शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्याने गलीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणाऱ्या रविंद्र जडेजाच्या हाती सोपा झेल दिला. त्यामुळे रोहित 3 चेंडूत शुन्य धावा करून बाद झाला.

नकोसा विक्रमही नावावर

रोहित शुन्यावर बाद झाल्याने त्याच्या नावावर नकोसा विक्रमही झाला आहे. रोहितची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही 16 वी वेळ होती. त्यामुळे त्याच्या नावावर आता आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम झाला आहे.

या यादीत रोहित पाठोपाठ सुनील नारायण, मनदीप सिंग आणि दिनेश कार्तिक आहेत. हे तिघेही आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 15 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत. तसेच अंबाती रायुडू 14 वेळा आयपीएलमध्ये शुन्यावर बाद झाला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारे खेळाडू (6 मे 2023 पर्यंत)

  • 16 वेळा - रोहित शर्मा

  • 15 वेळा - सुनील नारायण

  • 15 वेळा - मनदीप सिंग

  • 15 वेळा - दिनेश कार्तिक

  • 14 वेळा - अंबाती रायुडू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT