MS Dhoni Argues with Umpires Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Argues with Umpires: पाथिरानासाठी धोनीने थांबवला खेळ? पंचांशीही भिडला..., वाचा नक्की काय झाली भानगड

एमएस धोनी IPL 2023 पहिल्या क्वालिफायर सामन्यात पाथिरानासाठी पंचांशी बराच काळ चर्चा करताना दिसला होता.

Pranali Kodre

MS Dhoni Argues with Umpires: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर सामन्यात 15 धावांनी विजय मिळवला. या विजयासह एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे.

धोनीची पंचांशी चर्चा

पण, पहिल्या क्वालिफायर सामन्यात धोनीच्या एका कृत्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. झाले असे की चेन्नईने गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानचा पाठलाग करताना 16 व्या षटकापूर्वी धोनी बराचवेळ पंचांशी चर्चा करताना दिसला होता.

यामागे कारण होते की धोनीला या षटकात मथिशा पाथिरानाला गोलंदाजी द्यायची होती. मात्र, पंचांनी पाथिरानाला गोलंदाजी करण्यापासून थांबवले होते. कारण त्याने नियमानुसार गोलंदाजी करण्यासाठी पात्र ठरण्यासाठी मैदानावर निर्धारित वेळ घालवेला नव्हता. पाथिराना त्याचे पहिले षटक टाकल्यानंतर काहीवेळासाठी मैदानातून बाहेर गेला होता.

त्यामुळे त्याने पुन्हा गोलंदाजी करण्याआधी मैदानात निर्धारित वेळ घालवलेला नव्हता. त्याचमुळे पंचांकडून त्याला गोलंदाजीसाठी थांबवण्यात आले होते. त्याचमुळे धोनी मैदानातील दोन्ही पंचांशी चर्चा करताना दिसला होता. यावेळी अन्य खेळाडूही त्याच्याबरोबर होते. धोनी बराचवेळ पंचांशी बोलत होता.

यावेळी धोनी दुसर्‍या गोलंदाजाला गोलंदाजी देण्याऐवजी पाथिराना पुन्हा गोलंदाजीसाठी पात्र होण्यासाठी उरलेला वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अनेकांनी अंदाज लावला. अखेर या चर्चेदरम्यान, जवळपास 4 ते 5 मिनिटे गेल्याने पाथिराना गोलंदाजीसाठी पात्र ठरला आणि त्याने या षटकात गोलंदाजी केली.

पण धोनीच्या या कृत्यावर त्यावेळी समालोचन करत असलेल्या समालोचकांकडूनही प्रश्न विचारण्यात आले. तसेच सोशल मीडियावरही यावर उलट-सुलट चर्चा झालेल्या पाहायला मिळाल्या.

सायमन डूल समालोचन करताना म्हणाले की 'पंचांबरोबर 5 मिनिटे वाद, विनाकारण होते. त्याने दुसऱ्याला गोलंदाजी देण्याऐवजी फक्त खेळ थांबवला. कदाचीत सामना संपल्यावर त्याला याचा खेद वाटू शकतो.'

चेन्नईचा विजय

दरम्यान, पाथिरानाने टाकेलेल्या या 16 व्या षटकात विजय शंकर आणि राशीद खान यांनी मिळून 13 धावा काढल्या. पण त्यांची ही जोडी पाथिरानानेच 18 व्या षटकात शंकरला बाद करत तोडली. त्यानंतर दर्शन नळकांडेही याच षटकात धावबाद झाला. अखेर गुजरातचा संघ 20 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर 157 धावांत सर्वबाद झाला.

गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावा केल्या, तसेच राशीद खानने 30 धावांची खेळी केली. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. चेन्नईकडून गोलंदाजीत रविंद्र जडेजा, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली.

त्याआधी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना  20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच डेव्हॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली. त्याचबरोबर अखेरीस रविंद्र जडेजानेही 22 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.

गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT