MS Dhoni and Matheesha Pathirana Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: जेव्हा कॅप्टनकूल भडकतो...! CSK च्या युवा खेळाडूला भर सामन्यात धोनीने सुनावलं

राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात एमएस धोनी आपल्याच संघातील युवा खेळाडूवर चिडल्याचे दिसले होते.

Pranali Kodre

MS Dhoni angry on Matheesha Pathirana: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 32 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी चिडला होता.

खरंतर धोनी हा नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला मैदानात चिडताना खूपच क्वचित पाहायला मिळाले आहे. तो चिडतानाची दुर्मिळ गोष्ट गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यातही पाहायला मिळाली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाकडून 16 व्या षटकात शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल फलंदाजी करत होते. तसेच मथीशा पाथिराना गोलंदाजी करत होता. पाथिरानाने या षटकातील तिसरा चेंडू स्लोवर बाउंसर टाकला. ज्यावर फटका खेळणे हेटमायरला जमले नाही.

तो चेंडू मागे गेल्यानंतर यष्टीरक्षक धोनीने तो पकडला. त्याचवेळी हेटमायर आणि जुरेल यांनी चोरटी धाव घेतली. पण ते ही धाव घेत असताना धोनीने पकडलेला चेंडू थेट स्टंपच्या दिशेने फेकला होता. पण पाथिराना मधे उभा असताना चेंडू त्याला लागून बाजूला गेला. ते पाहून धोनी पाथिरानावर भडकला होता. तसेच शिवम दुबेच्या खराब क्षेत्ररक्षणावर देखील धोनी चिडल्याचे दिसले होते.

दरम्यान, असे असले तरी धोनीने सामन्यानंतर पाथिरानाच्या गोलंदाजीचे मात्र कौतुक केले. त्याने म्हटले की स्कोअरकार्डवर दिसून येत नसले, तरी पाथिरानाने चांगली गोलंदाजी केली.

जयपूरमध्ये दुसऱ्यांदा दिसले धोनीचे रौद्र रुप

खरंतर जयपूरमध्ये आयपीएल सामना खेळताना धोनी चिडलेला दिसण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी 2019 मध्ये जयपूरमध्येच झालेल्या राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील आयपीएल सामन्यातही धोनीचे रौद्र रुप पाहायला मिळाले होते.

त्यावेळी धोनी (58) आणि अंबाती रायुडूने (57) चेन्नईला 4 बाद 24 या कठीण परिस्थितीतून बाहेर काढत विजयाच्या मार्गावर आणले होते. अखेरच्या षटकात चेन्नईला 18 धावांची गरज होती. त्यावेळी धोनी आणि जडेजा फलंदाजी करत होते. तसेच राजस्थानकडून बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर जडेजाने षटकार खेचला होता.

पण तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने धोनीला बाद केले होते. त्यावेळी चेन्नईला 3 चेंडूत 8 धावांची गरज होती. पण पुढचा चेंडू स्टोक्सने स्लोअर टाकला, मात्र त्याच्या हातून तो सुटल्याने कंबरेच्या वर फुलटॉस गेला. त्यावेळी पंच उल्हास गांधे यांनी नो-बॉलसाठी इशारा करण्यासाठी हात वर केला, पण त्यांनी नंतर स्केअर लेगचे पंच ब्रुस ऑक्सेनफॉर्डबरोबर चर्चेनंतर तो निर्यय बदलला.

याबद्दल धोनी प्रचंड भडकला होता. तो चिडून मैदानावरही आला होता आणि पंचांशी वाद घातला होता. पण नंतर मिचेल सँटेनरने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला होता. दरम्यान, धोनीला त्याच्या या चिडण्यामुळे दंड झाला होता. तसेच अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली होती.

राजस्थानने जिंकला सामना

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 202 धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 77 धावांची खेळी केली. तसेच ध्रुव जुरेलने 34 धावांची खेळी केली. चेन्नईकडून तुषार देशपांडेने 2 विकेट्स घेतल्या.

तसेच 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 6 बाद 170 धावा करता आल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने 47 धावांची खेळी केली. पण अन्य कोणाला खास काही करता आले नाही. राजस्थानकडून ऍडम झम्पाने 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT