Cristiano Ronaldo Retirement Dainik Gomantak
क्रीडा

ख्रिस्तियानो रोनाल्डो घेणार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती? बहिणीनं केला मोठा खुलासा

Cristiano Ronaldo Retirement: जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये गणला जाणारा क्रिस्टियानो रोनाल्डो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Sameer Amunekar

जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये गणला जाणारा क्रिस्टियानो रोनाल्डो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. रोनाल्डोची बहीण कटिया अवेइरो हिने केलेल्या वक्तव्यामुळे 2026 चा फीफा विश्वचषक हा पोर्तुगालच्या दिग्गज स्टारचा अखेरचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या खुलाशामुळे जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

बहिणीच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

41 वर्षीय रोनाल्डोच्या निवृत्तीबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध तर्कवितर्क सुरू होते. मात्र कटिया अवेइरोने एका मुलाखतीत, "या प्रवासाचा आनंद घ्या, कारण तो आता फार काळ टिकणार नाही.

विश्वासार्ह माहितीनुसार हा रोनाल्डोचा 'लास्ट डान्स' असेल," असे सांगितल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे विश्वचषक 2026 नंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

2030 विश्वचषकाबाबत मतभेद

याआधी पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी रोनाल्डोच्या फिटनेसचे कौतुक करत तो 2030 च्या विश्वचषकातही खेळू शकतो, असे मत व्यक्त केले होते. मात्र पोर्तुगाल फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष पेड्रो प्रोएंका यांनी या शक्यतेबाबत साशंकता व्यक्त केली होती.

त्यांच्या मते, 2030 मध्ये रोनाल्डो खेळला तर तो मोठा आश्चर्याचा धक्का असेल. आता बहिणीच्या ताज्या वक्तव्यानंतर 2030 विश्वचषकात त्याच्या सहभागाच्या चर्चांना जवळपास पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT