Shikhar Dhawan Huma Qureshi Dainik Gomantak
क्रीडा

Shikhar Dhawan's Bollywood Debut: क्रिकेटपटू शिखर धवन अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत झाला रोमँटिक

'डबल एक्स एल' या सोशल कॉमेडी चित्रपटातून करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

गोमन्तक डिजिटल टीम

Shikhar Dhawan's Bollywood Debut: भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर शिखर धवन हा आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या आगामी 'डबल XL' या चित्रपटात शिखरने भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील हुमा आणि शिखऱचा एक रोमँटिक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

नुकत्याच एका मुलाखतीतही शिखरने या चित्रपटातून पदार्पण करत असल्याबद्दल मत व्यक्त केले होते. हा निर्णय अगदी सहजपणे घेतल्याचे त्याने सांगितले होते. शिखर म्हणाला की, मी एक खेळाडू आहे आणि देशासाठी खेळत राहणे हेच माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात खूप व्यग्र असतो.

फावल्या वेळेत मला चित्रपट पाहायला आवडतात. जेव्हा या चित्रपटाची ऑफर माझ्याकडे आली तेव्हा या कथेचा माझ्यावर खूप खोल प्रभाव पडला. या चित्रपटातून समाजासाठी एक खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते, युवा मुले आणि मुलींनी आपल्या आपली स्वप्ने पुर्ण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. दरम्यान, शिखरची ही भूमिका पाहुण्या कलाकाराची असणार आहे.

4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रीलीज होत आहे. ही दोन महिलांची कहाणी आहे. त्या दोघीही स्वतःच्या स्वप्नांचा शोध घेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रीलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर याबाबतची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रमानी यांनी केले आहे. चित्रपटात हुमा, सोनाक्षीशिवाय झहीर इकबाल, महत राघवेंद्र यांच्याही भूमिका आहेत.

क्रिकेट आणि बॉलीवूड हे नाते खूप जुने आहे. जुन्या काळातील अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मन्सुर अली खान पतौडी यांच्याशी विवाह केला होता. अभिनेत्री नीना गुप्ता या तर लग्नाआधीच वेस्टइंडिजचा धडाकेबाज फलंदाज विव्हियन रिचर्डस याच्याशी रिलेशनमध्ये होत्या.

त्यांना या रिलेशनमधून झालेली मसाबा ही मुलगीही आहे. अगदी आत्ताचे ताजे उदाहरण म्हणजे विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न. नुकतेच अभिनेत्री सारा अली खान हीचे नाव क्रिकेटपटू शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT