cricket story ind vs sl 2nd test bengaluru sri lanka register their second lowest test score against india  Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs SL 2nd Test: श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर गारद, लाजिरवाणा विक्रम

बुमराहशिवाय मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन बळी घेतले

दैनिक गोमन्तक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. मोहाली कसोटी सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला. अशाप्रकारे दुसरा सामना जिंकून भारतीय संघ श्रीलंकेला नेस्तनाबूत करू इच्छितोय. टीम इंडियाचा या वर्षातील मायदेशातला हा शेवटचा कसोटी सामना आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या संघाचा पहिला डाव अवघ्या 109 धावांत आटोपला. यासह दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.

खरं तर, भारताविरुद्धच्या कसोटी इतिहासात श्रीलंकेची (Sri Lanka) ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताविरुद्ध श्रीलंकेची किमान धावसंख्या 82 धावा आहे. 1990 मध्ये चंदीगड येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात ही धावसंख्या उभारली होती. त्या डावात वेंकटपती राजूने भारतासाठी अप्रतिम गोलंदाजी करत सहा खेळाडूंना बाद केले.

जसप्रीत बुमराहने श्रीलंकेला 109 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या वेगवान गोलंदाजाने 24 धावांवर पाच खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कसोटी क्रिकेटमध्ये (cricket) भारतीय भूमीवर बुमराहची ही पहिली आणि एकूण आठव्यांदा पाच बळी ठरले. बुमराहशिवाय मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन बळी घेतले.

श्रीलंकेचा डाव 109 धावांत गुंडाळल्याने भारताला 143 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 252 धावा केल्या होत्या, भारतीय संघाने पहिल्या डावात 252 धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरने 92, ऋषभ पंत 39 आणि हनुमा विहारीने 31 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर धनंजय डी सिल्वाला दोन आणि सुरंगा लकमलला एक यश मिळाले.

भारताविरुद्ध एसएलची किमान धावसंख्या :

82 चंडीगढ 1990 109

बेंगळुरू 2022 119

अहमदाबाद 1994 134

कोलंबो PSS 2015

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT