ICC Dainik Gomantak
क्रीडा

आयसीसीने इंग्लंडला दिला मोठा धक्का, चौथ्या क्रमांकावर टीम इंडिया

टीम इंडिया आतापर्यंत 2 मालिकेत 6 कसोटी सामने खेळले आहेत. 3 विजय आणि एक पराभव आहे

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्याने इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यात इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला. पहिल्या कसोटीत संघाने 5 षटके कमी टाकली होती. त्यानंतर स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत इंग्लंडचे 5 गुण कापले होते. मात्र आता आयसीसीने या संघाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वास्तविक, आयसीसीने मान्य केले की इंग्लंडने 5 नव्हे तर 8 षटके कमी टाकली.

अशा स्थितीत त्याचे गुणही 5 ऐवजी 8 वजा झाले. यामुळे इंग्लंडचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडपेक्षाही खाली 7व्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक षटकामागे एक गुण वजा केला जातो. कसोटीनंतर आयसीसीने इंग्लंडला स्लो ओव्हर रेटसाठी 100 टक्के मॅच फीचा दंडही ठोठावला.

पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला, तर ऑस्ट्रेलियन संघाने आयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पहिला सामना खेळून विजयाची नोंद करत हा संघ थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. पहिली कसोटी 9 गडी राखून जिंकून ऑस्ट्रेलियाने मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेत विजयी टक्केवारीच्या आधारे क्रमवारी निश्चित केली जाते. या अर्थाने, श्रीलंका आतापर्यंत सर्व 2 सामने जिंकून 100% सह अव्वल आहे.

तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आणि चौथ्या क्रमांकावर टीम इंडिया

पाकिस्तान संघाने चॅम्पियनशिप (championship) अंतर्गत आतापर्यंत दोन मालिका खेळल्या असून, 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. या अर्थाने, संघ 75% सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाची (team india) विजयाची टक्केवारी 58.33 आहे. आतापर्यंत 2 मालिकेत 6 कसोटी सामने खेळले आहेत. 3 विजय आणि एक पराभव आहे. दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. टीम इंडियाला पेनल्टी ओव्हर्समध्ये 2 पॉइंट्सचे नुकसानही सहन करावे लागले.

अशा प्रकारे, नियम आणि पॉइंट सिस्टम समजून घ्या

2021 ते 2023 या कालावधीत खेळल्या जाणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा दुसरा सीजन आहे. 4 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. यासाठी आयसीसीने आधीच नवीन नियम आणि पॉइंट सिस्टम जारी केले आहेत. यावेळी कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतील. त्याचवेळी, सामना जिंकण्यासाठी 100 टक्के, टाय झाल्यास 50 टक्के, ड्रॉ झाल्यास 33.33 टक्के आणि हरल्यास 0 टक्के गुण जोडले जातील. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण 24 गुण आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 60 गुण मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT