भारतीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टरची पुन्हा होणार एन्ट्री ! सौरव गांगुलीने दिले संकेत

राहुल जेव्हा मुख्य प्रशिक्षक झाला तेव्हा गांगुलीने त्याच्या जागी त्याचा माजी सहकारी आणि महान फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने (VVS Laxman) घेतली.
Sourav Ganguly

Sourav Ganguly

Dainik Gomantak 

Published on
Updated on

सौरव गांगुलीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (BCCI) प्रवेश झाल्यापासून, त्याने अधिकाधिक माजी खेळाडूंना संघात काम करण्यास आणि भारतीय क्रिकेटच्या सुधारणेसाठी योगदान देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, बोर्ड अध्यक्षपदी आल्यानंतर राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवले. राहुल यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये होता. राहुल जेव्हा मुख्य प्रशिक्षक झाला तेव्हा गांगुलीने त्याच्या जागी त्याचा माजी सहकारी आणि महान फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने (VVS Laxman) घेतली. लक्ष्मणनने काही दिवसांपूर्वी एनसीएचा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. आता भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) कधीतरी टीम इंडियामध्ये (Team India) सामील होऊ शकतो, असे संकेत गांगुलीने दिले आहेत. गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील बहुतांश काळ या दिग्गजांसोबत घालवला आहे.

<div class="paragraphs"><p>Sourav Ganguly</p></div>
IND VS SA: मालिका जिंकण्यासाठी विराटला मास्टर ब्लास्टशी करावी लागणार बरोबरी!

दरम्यान, पत्रकार बोरिया मजमुदार यांच्या 'बॅकस्टेज विथ बोरिया' या शोमध्ये गांगुलीने लक्ष वेधले की, सचिनही भारतीय क्रिकेटमध्ये लवकरच दिसणार आहे. सचिनही काम करण्यास उत्सुक आहे, परंतु सध्या हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा आल्याने ज्याचे निराकरण करणे आवश्यक असल्याचे गांगुलीने म्हटले.

यापेक्षा मोठी बातमी असू शकत नाही

सचिनचे भारतीय क्रिकेटमध्ये काम करताना दिसणार यापेक्षा मोठी बातमी असू शकत नाही, असं गांगुली म्हणाला. तो पुढे म्हणाला, “सचिनचं व्यक्तिमत्व साहजिकच शांत, संयमी आहे. त्याला या सगळ्यात पडायचे नाही. मला खात्री आहे की, सचिन भारतीय क्रिकेटमध्ये काम करणार यापेक्षा मोठी बातमी असूच शकत नाही. तुम्ही जे काही करता, ते योग्य किंवा अयोग्य, कुठेतरी हितसंबंधांचा संघर्ष नक्कीच असेल. कधीकधी मला हे खूप अनावश्यक वाटते. त्यामुळे तुम्हाला सर्वोत्तम टॅलेंट कनेक्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधावा लागेल. कधीतरी सचिनला भारतीय क्रिकेटमध्ये सामील होण्याचा मार्ग सापडेल.

CAC मध्ये सामील झाले

सचिन याआधी गांगुली आणि लक्ष्मण यांच्यासह क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC) होता. या सीएसीने अनिल कुंबळेची (Anil Kumble) टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यांच्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली. शास्त्रींच्या निवृत्तीनंतर सचिन मात्र आयपीएल संघ मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. तो एक मार्गदर्शक म्हणून संघासोबत काम करत राहिला. आयपीएल 2021 मध्ये, फ्रँचायझीने त्याची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com