Spinner Muttiah Muralitharan Dainik Gomantak
क्रीडा

महान फिरकीपटू मुरलीधरनचा T20 मधील फिरकीपटूना मोलाचा सल्ला

मुरलीधरनने आयसीसीसाठी लिहिलेल्या लेखात दिला फिरकीपटूना दिलासा

Dainik Gomantak

Cricket: कसोटीमध्ये 800 तसेच एकदिवसीयमध्ये 534 विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या महान फिरकीपटू मुरलीधरनला (Spinner Muttiah Muralitharan) वाटते की T20 क्रिकेट मध्ये गोलंदाज कसोटी किंवा 50 षटकांच्या क्रिकेटप्रमाणे विकेट घेऊ शकेल यात शंका आहे. T20 क्रिकेटमध्ये फिरकीपटूंसाठी संरक्षण करणे हाच सर्वोत्तम हल्ला आहे आणि कारण चेंडू हळू असतानाच फलंदाजांना त्यांचे फटके खेळताना जास्त त्रास होतो. असे मुरलीधरन म्हणाला.

मुरलीधरनने त्याच्या आयसीसीसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, "T20 मध्ये बचावात्मक गोलंदाजी करणे म्हणजे हल्ला करण्यासारखे आहे. गोलंदाजाने प्रति षटक 6 किंवा 6.5 धावांचे लक्ष्य ठेऊन गोलंदाजी केली तरच T20 मध्ये विकेट मिळतील. आपल्या T20 मधील आतापर्यंतच्या अनुभवानुसार मैदानात उतरताना फिरकीपटूने बचवतामक गोलंदाजी करण्याच्या उद्देशाने उतरले पाहिजे.

सुरुवातीला असे वाटले की T20 क्रिकेटमुळे फिरकीपटूची कारकीर्द धोक्यात येईल पण आता स्पष्ट होत चालले की, चेंडू जितका हळू येईल तितकाच फलांदाजासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यामुळे फिरकीपटू आता महत्त्वाचे गोलंदाज बनू लागले आहेत, वेगवान गोलंदाजही कमी वेगात गोलंदाजी करु लागले आहेत, कारण प्रत्येक गोलंदाज फलंदाजाला चेंडू चकवण्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत असतो.

श्रीलंका संघाबद्दल बोलताना, मुरलीधरनने कबूल केले की, श्रीलंकेचा क्रिकेट खेळण्याचा स्तर गेल्या काही वर्षांमध्ये खालावला आहे. मुरलीधरन म्हणाला की T20 विश्वचषक 2014 चा विजेता "श्रीलंकेच्या संघाला पहिल्या फेरीत क्वालिफायरसाठी खेळावे लागेल, गेल्या पाच-सहा वर्षांत संघाचा दर्जा इतका खाली गेला आहे, श्रीलंकेला प्रथमच पात्रता खेळावी लागेल, पण हा संघ चांगली कामगिरी करू शकतो." माझा श्रीलंकेला सल्ला आहे की, "विरोधी संघांविरुद्ध खेळताना चांगले प्रदर्शन करावे लागेल. विरोधी खेळाडूंच्या प्रतिष्ठेला न घाबरता चांगला खेळ दाखवावा लागेल, हीच T20 क्रिकेटची खरी गुणवत्ता आहे." असे मुरलीधरन म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

SCROLL FOR NEXT