गोव्याची टी-20 आव्हानासाठी तयारी

भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी मैदानावर मोसमपूर्व सरावाचा अंतिम टप्पा
Goa cricket team prepares for T20 challenge
Goa cricket team prepares for T20 challengeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा (Goa Cricket Team) समावेश एलिट अ गटात असून पंजाब, तमिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र, पुदुचेरी असे मातब्बर प्रतिस्पर्धी या गटात आहेत. त्यादृष्टीने प्रबळ आव्हानास सामोरे जाण्यासाठी गोव्याच्या संघाच्या मोसमपूर्व सरावाचा अंतिम टप्पा गुरुवारपासून मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी येथील मैदानावर सुरू झाला.

Goa cricket team prepares for T20 challenge
Goa: धारगाळ क्रिकेट स्टेडियम प्रकल्पात 10 हजार चौरस मीटर जमीन सोडणे गरजेचे

दिल्ली दौऱ्यावरून परतलेल्या संभाव्य संघाला विश्रांती देण्यात आली होती. खेळाडू ताजेतवाने व्हावेत हा त्यामागचा उद्देश होता. विश्रांतीनंतर संभाव्य खेळाडू गुरुवारी पर्वरीतील जीसीए अकादमी मैदानावर जमा झाले व त्यांनी सरावात घाम गाळण्यास सुरवात केली. गोव्याची स्पर्धेतील मोहीम चार नोव्हेंबरपासून सुरू होईल. विलगीकरण प्रक्रियेसाठी संघ 27 ऑक्टोबरला लखनौ येथे रवाना होईल. एलिट अ गट सामने लखनौ येथे खेळले जातील. गोव्याचा पहिला सामना ओडिशाविरुद्ध होईल.

Goa cricket team prepares for T20 challenge
IPL 2021: 'खेला होबे' म्हणत KKR ने DC ला केले गारद

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या 2020-21 मोसमात गोव्याचा संघ यावर्षी जानेवारीत गोव्याचा संघ इंदूर येथे एलिट ड गटात खेळला होता. तेव्हा गोव्याने पाचपैकी दोन सामने गमावले होते. त्या स्पर्धेत खेळलेल्या संघातील बहुतेक खेळाडू आगामी स्पर्धेत खेळण्याचे संकेत आहेत. अमित वर्मा आणि अशोक दिंडा या तेव्हाच्या पाहुण्या क्रिकेटपटूंची जागा शुभम रांजणे व श्रीकांत वाघ घेतील, तर गतमोसमात खेळलेला एकनाथ केरकर संघातील तिसरा पाहुणा क्रिकेटपटू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com