Rishabh Pant
Rishabh Pant  Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Accident: पंड्या ते पाँटिंग, अपघातात जखमी झालेल्या पंतसाठी क्रिकेटविश्वातून प्रार्थना, पाहा ट्वीट्स

Pranali Kodre

Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या बाबतीत शुक्रवारी सकाळी मोठी बातमी समोर आली. त्याचा कार अपघात झाला आहे. दिल्लीवरून रुडकीला जात असताना त्याची बीएमडब्ल्यू कार डिव्हाडरला धडकली. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वातून त्याच्या तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कारला अपघात झाल्यानंतर लगेचच त्याला रुडकीमधील सक्षम हॉस्पिटलमध्ये हलवण्या आले होते. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले, त्यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तिथे त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात येतील.

तसेच त्याच्या डोक्याला, गुडघ्याला, मनगटाला आणि पायाला दुखापती झाल्या असल्याचेही बीसीसीआयने माहिती दिली आहे. त्याचबरोबर बीसीसीआय त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात असून त्याच्या उपचारांवरही लक्ष ठेवून आहेत. तसेच बीसीसीआयने अशीही माहिती दिली की त्याची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंत लवकरात लवकर बरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्वीट केले आहे की 'ऋषभ पंतसाठी प्रार्थना करतो. सुदैवाने त्याच्या जीवाला धोका नाही. चॅम्प लवकर बरा हो.'

तसेच आयपीएलमध्ये पंत कर्णधार असलेल्या दिल्ली कॅपिटल्सनेही तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानेही ट्वीट केले आहे की 'ऋषभ पंतबद्दल विचार करत आहे. आशा आहे की तुझ्या प्रकृतीत सुधारणा होईल आणि तू तुझ्या पायावर लवकरच उभा राहशील. तू लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करतो.'

याशिवाय देखील अनेकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

पंत भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असून आत्तापर्यंत त्याने भारताकडून 33 कसोटी सामने खेळताना 5 शतकांसह 2271 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 30 वनडे सामने खेळताना 865 धावा केल्या आहेत. याशिवाय पंतने 66 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळला असून 987 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT