ACC on Pakistan Cricket Board Chief Najam Sethi: आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) पुढील दोन वर्षांचे क्रिकेट कॅलेंडर जारी केले आहे. यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवे अध्यक्ष नजम सेठी यांनी आरोप केला की, 'हे कॅलेंडर जारी करण्यापूर्वी पीसीबीकडून कोणताही सल्ला घेण्यात आला नाही किंवा कोणतीही माहिती देण्यात आली नाही.' आता एसीसीने नजम सेठी यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
यावरुन भारत आणि पाकिस्तानही (Pakistan) आमनेसामने आले आहेत. खरेतर, ACC चे अध्यक्ष जय शाह आहेत, जे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव म्हणूनही काम करत आहेत.
पुढील दोन वर्षांच्या क्रिकेट कॅलेंडरबाबत एसीसीने अध्यक्ष जय शाह यांचा बचाव केला आहे. एसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयचे सचिव आणि एसीसी अध्यक्ष शाह यांनी गुरुवारी सोशल मीडियावर दोन वर्षांचे कार्यक्रम कॅलेंडर (एसीसी) शेअर केले. यानंतर सेठी यांनी आरोप केला की, पीसीबीला यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
यावर उत्तर देताना नजम सेठी यांनी ट्विट केले की, 'ACC 2023-24 ची नवीन रचना आणि कॅलेंडर एकतर्फी जारी केल्याबद्दल जय शाहा यांचे धन्यवाद. विशेषत: आशिया कप-2023 साठी ज्याचे यजमान पाकिस्तान आहे. जेव्हा तुम्ही सर्व काही स्वतःहून ठरवता तेव्हा तुम्ही आमच्या PSL 2023 ची रचना आणि कॅलेंडर देखील पाहू शकता. आम्हाला यासंबंधीच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.'
ACC ने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. ACC ने सांगितले की, पीसीबीसह इतर सदस्य देशांना 22 डिसेंबर (2022) रोजी वेळापत्रकाबद्दल माहिती देण्यात आली होती, परंतु त्यांच्या (PCB) बाजूने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शाह यांनी सामायिक केलेल्या कार्यक्रमात, आशिया चषक सप्टेंबर 2023 मध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळला जाईल असे सांगण्यात आले आहे, परंतु त्यात यजमान देशाचा उल्लेख नाही. बीसीसीआयचे सचिव या नात्याने शाह यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.