Former BCCI Official Prakash Poddar: बंगालचे माजी कर्णधार आणि ज्युनियर सिलेक्टर प्रकाश पोद्दार यांचे मंगळवारी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. 1940 मध्ये जन्मलेल्या पोद्दार यांनी 1960 ते 1977 दरम्यान बंगालकडून 74 सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 11 शतकांसह 3836 धावा केल्या होत्या. पोद्दार हे बंगालच्या संघाचे कर्णधार होते, पण त्यांनी राजस्थानकडून खेळताना दोनदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती. 1970-71 च्या रणजी हंगामात 70.25 च्या सरासरीने 562 धावा करुन ते तिसरे सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते.
दरम्यान, पोद्दार यांनी निवृत्तीनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) च्या 'टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट विंग' (TRDS) चे अधिकारी म्हणून काम केले, ज्याची स्थापना 2002 मध्ये तरुण आणि होतकरु भारतीय क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी करण्यात आली होती. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत जगमोहन दालमिया यांनी स्थापन केलेल्या या पॅनेलचे अध्यक्ष म्हणून दिलीप वेंगसरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. टीआरडीएसमध्ये काम करताना 2003 मध्ये महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) शोध घेण्याचे श्रेय पोद्दार यांना जाते.
त्यावेळी, टीआरडीएस अधिकारी म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला पाठवलेल्या अहवालात पोद्दार यांनी धोनीबद्दल लिहिले होते की, "तो चेंडू चांगल्या पध्दतीने हिट करतो, त्याच्याकडे खूप पॉवर आहे, पण त्याला यष्टिरक्षणावर काम करावे लागेल.''
यानंतरच, 2003/04 मध्ये धोनीची भारत A साठी निवड झाली, तर 23 डिसेंबर 2004 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) 2007, एकदिवसीय विश्वचषक 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.