IPL 2024 Auction Rohit Sharma | MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024 Auction: रोहित शर्मा MI सोडून दुसऱ्या फ्रँचायझीकडे जाऊ शकतो का? जाणून घ्या काय आहेत लिलावनंतर ट्रेडचे नियम

Rohit Sharma Trade: तथापि, रोहित शर्माला दिल्ली कॅपिटल्सने संपर्क केला होता की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्याचवेळी रोहित शर्माही चेन्नई सुपर किंग्जसोबत जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

Ashutosh Masgaunde

Could Rohit Sharma leave MI for another franchise? Know what are the post-auction trade rules:

IPL च्या 17 व्या हंगामासाठीचा लिलाव मंगळवार 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. त्याच्या काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले होते. या निर्णयावरून सातत्याने वाद निर्माण होत आहेत.

रोहितला दिल्ली कॅपिटल्ससह अनेक फ्रँचायझींनी संपर्क केल्याचेही वृत्त होते. यानंतर रोहित मुंबई इंडियन्स सोडून इतर कोणत्याही संघात जाऊ शकतो असा काही नियम आहे का, अशी चर्चा सुरू झाली. जाणून घेऊयाा असा काही नियम आहे का?

काय आहे दुसऱ्या संघात जाण्यासाठीचा नियम?

आयपीएलमध्ये जेव्हा एखादा खेळाडू एखाद्या संघाशी संबंधित असतो, तेव्हा तो ट्रेडिंग विंडोद्वारे दुसऱ्या संघात जाऊ शकतो. सीझन संपल्यानंतर एक महिन्यापासून लिलावाच्या एक आठवड्यापूर्वी ट्रेडिंग विंडो उघडी राहते.

लिलावानंतर खेळाडू दुसऱ्या संघात जाऊ शकतो की नाही याबाबतही नियम आहे. जेव्हा दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सशी संपर्क साधण्यास सांगितले गेले तेव्हा हे देखील उघड झाले की, मुंबईने करारामुळे हा ट्रेड पुढे जाऊ दिला नाही. पण तरीही रोहित दुसऱ्या फ्रँचायझीकडे जाऊ शकतो का?

लिलावानंतर ट्रेडिंगचे नियम काय आहेत?

लिलावानंतर देखील ट्रेडिंग विंडो उघडली जाणार आहे. म्हणजेच 19 डिसेंबरला लिलाव झाल्यानंतर बुधवार 20 डिसेंबरपासून ट्रेड विंडो उघडेल.

जर एखाद्या खेळाडूला दुसर्‍या फ्रँचायझीने संपर्क केला आणि संघाने करार केला, तर तो खेळाडू आपला संघ सोडून दुसर्‍या संघात जाऊ शकतो.

असंच काहीसं रोहित शर्माच्या बाबतीत घडले. सध्या बातमी अशी होती की, मुंबईने करारामुळे दिल्लीचा ट्रेड नाकारला. पण असा करार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा रोहितने मुंबईशी कमिटमेंट केली असेल.

म्हणजेच, जर रोहित शर्मा लिलावानंतर दुसऱ्या संघात जाण्यास इच्छुक असेल आणि त्याला इतर कोणत्याही फ्रेंचायझीची ऑफर आवडली तर तो नियमानुसार मुंबई इंडियन्स सोडू शकतो.

तथापि, रोहित शर्माला दिल्ली कॅपिटल्सने संपर्क केला होता की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्याचवेळी रोहित शर्माही चेन्नई सुपर किंग्जसोबत जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. सध्या या बातम्यांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या या सर्व केवळ अफवा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT