Coronavirus
Coronavirus Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League स्पर्धेत मध्ये कोरोनाचा शिरकाव

किशोर पेटकर

पणजी: गोव्यात जैव सुरक्षा वातावरणात सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत अखेर कोरोना विषाणूने शिरकाव केला. त्यामुळे शनिवारी नियोजित असलेला सामना आयोजकांना लांबणीवर टाकावा लागला. एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) आणि ओडिशा एफसी (Odisha FC) यांच्यातील सामना  शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार होता.

आयएसएल लीगतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पर्धेत पहिला कोविड बाधित आढळल्याची माहिती देण्यात आली. एटीके मोहन बागान संघाची एक खेळाडू कोविड बाधित ठरल्याचे आयएसएल वैद्यकीय समितीने जाहीर केल्यानंतर सामना लांबणीवर टाकण्यात आला. हा सामना नंतरच्या तारखेस खेळला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. स्पर्धेत आयएसएल वैद्यकीय तज्ज्ञ कोविडविषयक बाबींवर लक्ष ठेवून आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते, असेही पत्रकात नमूद केले आहे. शनिवारी रात्री होणारा एफसी गोवा आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर ठरल्यानुसार होईल.

2021-22 मोसमातील आयएसएल स्पर्धेला 19 नोव्हेंबर 2021 रोजी सुरवात झाली. तेव्हापासून 52 सामने जैव सुरक्षा वातारणात सूरळीतपणे झाले. आयएसएल स्पर्धा सुरू असताना कोविड बाधित सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गतमोसमात (2020-21) संपूर्ण आयएसएल स्पर्धा गोव्यातच जैव सुरक्षा वातावरपणात तीन स्टेडियमवर झाली होती. गोव्यात शनिवारी चोवीस तासात 1789 कोविड बाधित सापडले. सध्या राज्यात महामारीची तिसरी लाट सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT