Cooch Behar Trophy Dainik Gomantak
क्रीडा

Cooch Behar Trophy: गोव्याची पहिल्या डावातील आघाडीनंतर घसरण; चौथा दिवस रंगणार

एकूण 151 धावांची आघाडी

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy: कर्णधार पुंडलिक नाईक याच्या भन्नाट गोलंदाजीमुळे गोव्याने कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात चंडीगडवर पहिल्या डावात 24 धावांची आघाडी संपादली, पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही.

दुसऱ्या डावात यजमानांची घसरण उडाल्यामुळे सामन्याच्या शेवटच्या चौथ्या दिवशी रंगत अपेक्षित आहे.

सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या ‘अ’ गट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी खेळ थांबला तेव्हा गोव्याने दुसऱ्या डावात 6 बाद 88 वरुन 6 बाद 127 धावांची मजल मारली होती. त्यांच्यापाशी आता एकूण 151 धावांची आघाडी जमा झाली आहे.

दिशांक मिस्कीन 34 धावांवर खेळत असून यजमानांची त्याच्यावर मदार आहे. त्याने स्वप्नील गावकर याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी 39 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. सलामीच्या वीर यादव याने शानदार 40 धावा करूनही गोव्याला मजबूत स्थिती गाठता आली नाही.

त्यापूर्वी, गोव्याच्या 298 धावांना उत्तर देताना चंडीगडचा पहिला डाव दुसऱ्या दिवसअखेरच्या 3 बाद 180 वरून 274 धावांत आटोपला. त्यांचा सलामीचा फलंदाज बलराज सिंग याने शानदार शतक नोंदविताना कर्णधार पारस याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली.

36 धावांत 4 गडी बाद केलेल्या पुंडलिकने पारसला पायचीत बाद केल्यानंतर चंडीगडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. 7 विकेट त्यांनी 61 धावांत गमावल्या. पारसने 115 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 59 धावा केल्या.

शंतनू नेवगी याच्या गोलंदाजीवर पुंडलिकच्या हाती झेल दिलेल्या बलराज याने 298 चेंडूंत 110 धावा करताना 19 वेळा चेंडू सीमापार केला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 298

चंडीगड, पहिला डाव (3 बाद 180 वरून) ः 104.2 षटकांत सर्वबाद 274 (बलराज सिंग 110, पारस 59, निशुंक बिर्ला 18, पुंडलिक नाईक 18.2-6-36-4, स्वप्नील गावकर 19-6-49-1, युवराज सिंग 21-8-40-1, रुद्रेश शर्मा 14-6-34-1, यश कसवणकर 16-3-48-2, दर्शन महेंद्रकर 8-1-28-0, शंतनू नेवगी 8-2-20-1).

गोवा, दुसरा डाव ः 57 षटकांत 6 बाद 127 (वीर यादव 40, शंतनू नेवगी 13, निसर्ग नागवेकर 0, यश कसवणकर 19, दिशांक मिस्कीन नाबाद 34, पुंडलिक नाईक 0, जीवन चित्तेम 1, स्वप्नील गावकर नाबाद 4, अनमोल शर्मा 41-3, निखिल 28-2).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT