Sathiyan Gnanasekaran
Sathiyan Gnanasekaran  Dainik Gomantak
क्रीडा

CWG 2022: टेबल टेनिसमध्ये आणखी एक मेडल, साथियान गणानाशेखरन ने मिळवले ब्रॉन्ज

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. भारताने टेबल टेनिसमध्ये आज आणखी एक पदक जिंकले आहे. खरे तर, पुरुष एकेरी टेबल टेनिस सामन्यात भारताचा स्टार टेबल टेनिसपटू साथियान साथियान गणानाशेखरन (Sathiyan Gnanasekaran) याने इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहलचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.

रोमहर्षक सामना 4-3 असा जिंकला

इंग्लंडच्या (England) पॉल ड्रिंकहॉल विरुद्ध साथियानने शानदार कामगिरी केली. दोघांमधला हा सामना अतिशय रोमांचक ठरला. परंतु या सामन्यात साथियानने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला (11-9 11-3 11-5 8-11 9-11 10-12 11-9). या विजयासह त्याने टेबल टेनिसमध्ये (Table Tennis) भारताला आणखी एक मेडल मिळवून दिले. राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) स्पर्धेतील एकेरी सामन्यातील साथियानचे हे पहिले पदक आहे. त्याचवेळी, 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी हे 58 वे पदक आहे.

लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने पुरुष एकेरीच्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या जी योंग एनजीचा पराभव केला. लक्ष्य सेनने जी योंगविरुद्ध 19-21, 21-9, 21-16 असा विजय नोंदवला.

त्याच वेळी, भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने (PV Sindhu) शानदार कामगिरी केली. तिने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील एकेरीत तिचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT