Indian Team Dainik Gomantak
क्रीडा

Commonwealth Games 2022: टेबल टेनिसमध्ये भारताने मिळवले आणखी एक सुवर्णपदक

Indian Team: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चे आयोजन बर्मिंगहॅममध्ये करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

India Win Gold medal Table Tennis: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चे आयोजन बर्मिंगहॅममध्ये करण्यात आले आहे. यातच स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताने अंतिम सामन्यात सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला. भारतासाठी दुहेरीत, साथियान ज्ञानसेकरन आणि हरमीत देसाई यांनी योंग इझाक क्वेक आणि यु एन कोएन पांग यांचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या सामन्यात हरमीत देसाईने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.

दरम्यान, सांघिक स्पर्धेतील पहिल्या दुहेरीत साथियान आणि हरमीत या जोडीने 3-1 असा विजय नोंदवला. त्यांनी सिंगापूरच्या (Singapore) यांग येक आणि यू पेंग यांचा 13-11, 11-7 आणि 11-5 असा पराभव केला. यानंतर शरथ कमलला एकेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र दुसऱ्या एकेरीत भारताने बाजी मारली. यामध्ये साथियानने 3-1 असा विजय मिळवला. त्याने संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटी हरमीतने एकेरीचा सामना जिंकून भारताला (India) सुवर्णपदक मिळवून दिले.

विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी भारतीय टेबल टेनिस (Table Tennis) संघाचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT