Taapsee Pannu Dainik Gomnatak
क्रीडा

थॉमस चषक विजेत्या भारतीय संघाचा प्रशिक्षक; तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड

भारताचे पहिलेच जेतेपद; तापसीने केली खास पोस्ट

दैनिक गोमन्तक

भारतीय बॅडमिंटनपटूंनी इतिहासातील पहिलेच जेतेपद खेचत रविवारी इतिहास रचला. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 14 वेळा विजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. भारतीय पुरुष बॅडमिंटन प्रशिक्षक माजी डॅनिश बॅडमिंटनपटू मॅथिअस बोई हा अभिनेत्री तापसी पन्नूचा प्रियकर आहे. असं तापसीने खास पोस्ट करत म्हटलं आहे. (Coach of the Thomas Cup winning Indian team; Tapasi Pannu's boyfriend )

वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. या ऐतिहासिक विजयानंतर तापसी पन्नूने आपल्या बॉयफ्रेंडसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे . हा व्हिडीओ भारताच्या बॅडमिंटन संघाच्या विजयादरम्यान तिच्या घरातील आहे. यात तिच्या टीव्हीवर भारतीय बॅडमिंटन संघ जल्लोष करताना दिसत आहे.

भारतीय पुरुष संघाने रचला इतिहास

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या 73वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक.... ही स्पर्धा 14 वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर विजय मिळवून भारतीय पुरुष संघाने इतिहास घडवला. थॉमक चषक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले आहे.

भारताने डेन्मार्कवर 3-2 असा थरारक विजय मिळवला होता, तत्पूर्वी त्यांनी मलेशियावर मात केली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताने कांस्यपदक पक्के केले होते. परंतु त्यांनी थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

SCROLL FOR NEXT