Deepraj Gaonkar Dainik Gomantak
क्रीडा

CK Nayudu Trophy : गोव्याचा एकटा दीपराज चंडीगडला भिडला; कुटल्या एवढ्या धावा

कर्णधारामुळे गोव्याची चंडीगडविरुद्ध द्विशतकी धावसंख्या

किशोर पेटकर

CK Nayudu Trophy : इतर प्रमुख फलंदाजांनी चंडीगडच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली, पण कर्णधार दीपराज गावकर याने जिगर प्रदर्शित केली. आक्रमक शैलीत झुंजार फलंदाजी करताना त्याने शानदार शतक ठोकले, त्यामुळे गोव्याला कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी द्विशतकी धावसंख्या उभारता आली.

चंडीगड येथील सेक्टर 16 स्टेडियमवर रविवारपासून चार दिवसीय सामन्यास सुरवात झाली. दीपराजच्या 164 चेंडूंत तडाखेबंद 138 धावांमुळे गोव्याने सर्वबाद 225 धावा केल्या. गोव्याच्या कर्णधाराने 20 चौकार व एक षटकारही मारला.

सामन्याच्या दिवसअखेर यजमान संघाने 1 बाद 43 धावा केल्या. ते अजून 182 धावांनी मागे आहेत. डावातील पहिल्याच चेंडूवर गोव्याच्या हेरंब परब याने प्रदीप यादव याला पायचीत बाद केले. त्यानंतर हरनूर सिंग व कर्णधार अर्जुन आझाद यांनी गोव्याला आणखी यश मिळू दिले नाही.

जबाबदार शतकी खेळी

गोव्याला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर पंधराव्या षटकात त्यांची 3 बाद 22 अशी स्थिती झाली. पहिलाच सामना खेळणाऱ्या शिवम आमोणकरला फक्त सहा धावा करता आल्या, रणजीपटू मंथन खुटकर पाचच चेंडू टिकला. तो चार डावात दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला.

राहुल मेहताही मोठी धावसंख्या रचू शकला नाही. दीपराजने संघाला सावरताना कश्यप बखले याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 67 धावांची, तर वासू तिवारी याच्यासह पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

कश्यप जम बसत असताना बाद झाला, तर वासू पुन्हा एकदा धावबाद झाला. नंतर तळाच्या फलंदाजांच्या साथीने दीपराजने खिंड लढविली व गोव्याला द्विशतक पार करून दिले. चंडीगडच्या पारस याने 57 धावांत 5 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 71.4 षटकांत सर्वबाद 225 (राहुल मेहता 15, शिवम आमोणकर 6, मंथन खुटकर 0, कश्यप बखले 25, दीपराज गावकर 138, वासू तिवारी 14, मनीष काकोडे 1, कीथ पिंटो 10, हेरंब परब 2, जगदीश पाटील नाबाद 2, समीत आर्यन मिश्रा 0, करण शर्मा 1-34, रोहित धांडा 2-40, पारस 5-57, सी. धिंडसा 1-10).

चंडीगड, पहिला डाव : 11 षटकांत 1 बाद 43 (हरनूर सिंग नाबाद 16, अर्जुन आझाद नाबाद 25, हेरंब परब 1-19).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'अखेरपर्यंत त्याच्या मनात 'ती' सल राहिली', वर्षा उसगावकर यांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेच्या आयुष्यातील माहित नसलेला किस्सा

Kendra Trikon Rajyog 2026: ''प्रमोशन, प्रॉपर्टी अन् पैशाचा होणार पाऊस'', केंद्र त्रिकोण राजयोग 'या' 3 राशींचं रातोरात पालटणार नशीब

Goa Fire Accident: मध्यरात्री आगीचा तांडव! म्हावळींगेत दुकान जळून खाक, 'इतक्या' लाखांचं नुकसान; सुदैवानं मोठी जीवितहानी टळली

T20 World Cup 2026: "भारत वर्ल्ड कप जिंकणार नाही!" सेमीफायनलचं तिकीट पक्क करताच पाकिस्तानी खेळाडूचा जळफळाट Watch Video

T20 World Cup 2026: "नुसतं स्टार असून चालत नाही..." वर्ल्ड कपमधील अभिषेक शर्माच्या 'फ्लॉप शो' वर भडकला भारतीय दिग्गज

SCROLL FOR NEXT