CK Naidu Cricket Tournament Dainik Gomantak
क्रीडा

CK Naidu Cricket Tournament: शतकवीर मंथनने गोव्याला सावरले, चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

मंथन व योगेश जोडीने चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली.

किशोर पेटकर

मंथन खुटकर याने कर्णधारपदास साजेशी फलंदाजी करताना प्रेक्षणीय शतक झळकावले, त्यामुळे महाराष्ट्राविरुद्धच्या कर्नल सी. के. नायडू करंडक(CK Naidu Cricket Tournament) 25 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला सावरता आले.

सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर रविवारपासून सुरू झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी गोव्याने 5 बाद 229 धावा केल्या. सलामीच्या मंथनने 103 धावा करताना 223 चेंडूंतील खेळीत नऊ चौकार मारले. दिवसअखेर योगेश कवठणकर 55 धावांवर नाबाद होता. त्याने 180 चेंडूंतील संयमी खेळीत चार चौकार लगावले. मंथन व योगेश जोडीने चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली.

महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी

उपाहारापूर्वी गोव्याने तिसरी विकेट गमवली तेव्हा धावफलकावर शतकही लागले नव्हते. उपाहारानंतर मंथन व योगेश यांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना समर्थपणे सामना केला. चहापानानंतर मंथनने शतक पूर्ण केले, त्यानंतर लगेच तो बाद झाल्यामुळे जमलेली जोडी फुटली. त्याला सोहन जामाळे याने बाद केले. नंतर तुनीष सावकार जास्त टिकला नाही. मात्र योगेश व दीप कसवणकर (21) यांनी दिवसभरातील बाकी 11.5 षटके खेळून काढताना संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

इतर फलंदाज लवकर बाद

मंथन, योगेश यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली, पण गोव्याच्या अन्य प्रमुख फलंदाजांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. वैभव गोवेकर 11 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या आयुष वेर्लेकरला पाच, तर यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य सूर्यवंशीला 14 धावांवर माघारी परतावे लागले. तुनीष सावकार फक्त एकच धाव करू शकला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 90 षटकांत 5 बाद 229 (वैभव गोवेकर 11, मंथन खुटकर 103, आयुष वेर्लेकर 05, आदित्य सूर्यवंशी 14, योगेश कवठणकर नाबाद 55, तुनीष सावकार 01, दीप कसवणकर नाबाद 21, सोहन जामाळे 4-64).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT