Churchill Brothers wins I League football Dainik Gomantak
क्रीडा

I-League : चर्चिल ब्रदर्सची केंकरे एफसीवर मात

आय-लीग : पिछाडीवरून केंकरे एफसीवर 2-1 फरकाने मात

Kishor Petkar

I-League Football Match : चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड राखताना रविवारी सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत अपराजित मालिका पाच सामन्यांवर नेली. सामन्यातील अखेरच्या 15 मिनिटांत दोन गोल नोंदवून त्यांनी केंकरे एफसीवर पिछाडीवरून 2-1 फरकाने मात केली. (Churchill Brothers wins I-League football)

सामना पश्चिम बंगालमधील नैहाटी स्टेडियमवर झाला. चर्चिल ब्रदर्सचा (Churchill Brothers) नायजेरियन बचावपटू मोमो सिसे याच्या स्वयंगोलमुळे 49व्या मिनिटास केंकरे एफसीला आघाडी मिळाली, मात्र 75व्या मिनिटास ताजिकिस्तानच्या कोमरोन तुर्सुनोव याच्या गोलमुळे गोव्यातील संघाने बरोबरी साधली. नंतर 81व्या मिनिटास नायजेरियन केनेथ इकेचुक्वू याच्या गोलमुळे माजी विजेत्यांना आघाडी मिळाली. हाच गोल (Goal) अखेरीस निर्णायक ठरला.

चर्चिल ब्रदर्सचा हा 11 सामन्यांतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 17 गुण झाले असून विजेतेपदाच्या फेरीत खेळण्याची त्यांना संधी प्राप्त झाली आहे. सलग पाच सामन्यांतून त्यांनी 13 गुणांची कमाई करताना चार विजय व एक बरोबरी अशी कामगिरी केली आहे. स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या केंकरे एफसीला सलग चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले. एकंदरीत त्यांचा हा स्पर्धेतील आठवा पराभव ठरला. 10 सामन्यानंतर दोन गुणांसह ते शेवटच्या क्रमांकावर आहेत.

उत्तरार्धात गोल

सामन्याच्या पूर्वार्धात केंकरे एफसीने चर्चिल ब्रदर्सला तुल्यबळ लढत दिली. चर्चिल ब्रदर्सला संधी साधता आल्या नाहीत. विश्रांतीनंतर चौथ्या मिनिटास त्यांना धक्का बसला. प्रतिस्पर्धी खेळाडूचा क्रॉसपास दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात मोमो सिसे याने चेंडू आपल्याच संघाच्या नेटमध्ये मारला. पिछाडीनंतर चर्चिल ब्रदर्सने नेटाने खेळ केला आणि सामन्यातील 15 मिनिटे बाकी असताना त्यांना यश लाभले. लमगौलेन हंगशिंग याच्या शानदार क्रॉसपासवर कोमरोन याचा ताकदवान फटका थेट नेटमध्ये घुसला. त्यानंतर ताजिकी खेळाडूचा आणखी एक प्रयत्न हुकल्यानंतर नऊ मिनिटे बाकी असताना केनेथने संधी गमावली नाही. नायजेरियन खेळाडूने केंकरे एफसीच्या बचावफळीस गुंगारा देत प्रेक्षणीय गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT