Churchill Brothers win I-League football Dainik Gomantak
क्रीडा

चर्चिल ब्रदर्सची विजयी ‘गुढी’ नेरोका एफसीचा पहिला पराभव

दैनिक गोमन्तक

पणजी : चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल (football) स्पर्धेत विजयी गुढी उभारताना नेरोका एफसीची अपराजित मालिका खंडित केली. गोव्यातील संघाने सामना 4-2 फरकाने जिंकल्यामुळे इंफाळ-मणिपूर येथील संघाला स्पर्धेत पहिलाच पराभव पत्करावा लागला. (Churchill Brothers win I-League football)

सामना शुक्रवारी कोलकाता येथील कल्याणी स्टेडियमवर झाला. विश्रांतीला चर्चिल ब्रदर्स संघ 2-0 फरकाने आघाडीवर होता. त्यांच्यासाठी पहिला गोल नवव्या मिनिटास सौरव मोंडल याने नोंदविला, नंतर 28 व्या मिनिटास ताजिकिस्तानच्या कोमरॉन तुर्सुनोव याने आघाडी वाढविली. 50 व्या मिनिटास स्पॅनिश खेळाडू सर्जिओ मेंडीगुचिया इग्लेसियस याने नेरोका एफसीची पिछाडी एका गोलने कमी केली.

नायजेरियन केनेथ इकेचुक्वू याने 57 व्या मिनिटास अचूक पेनल्टी फटका मारून चर्चिल ब्रदर्सची आघाडी आणखी मजबूत केली. 89 व्या मिनिटास बदली खेळाडू आयव्हरी कोस्टचा ग्नोहेरे क्रिझो याच्या भेदक हेडरमुळे चर्चिल ब्रदर्सच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले. सर्जिओ याने 90+7 व्या मिनिटास सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केल्यामुळे नेरोका एफसीची पिछाडी 2-4 अशी कमी झाली.

स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनियो रुएदा फर्नांडेझ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच खेळणाऱ्या चर्चिल ब्रदर्सचा हा नऊ लढतीतील तिसरा विजय ठरला. ते आता तीन सामने अपराजित आहेत. त्यांचे 11 गुण झाले असून गुणतक्त्यात सहावा क्रमांक मिळाला. शुक्रवारच्या लढतीपूर्वी तीन विजय व चार बरोबरी नोंदविलेल्या नेरोका एफसीचे पहिल्या पराभवामुळे आठ लढतीनंतर 13 गुण व चौथा क्रमांक कायम राहिले.

गोव्यातील संघाचे वर्चस्व

आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सने (Churchill Brothers) शुक्रवारी नेरोका एफसीविरुद्ध सलग चौथा विजय नोंदवत वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी मणिपूरच्या संघाविरुद्ध अखेरचा सामना 15 डिसेंबर 2018 रोजी 1-2 फरकाने गमावला होता. त्यानंतर चर्चिल ब्रदर्सने 19 जानेवारी 2019 रोजी 2-1, 2 फेब्रुवारी 2020 रोजी 4-1, तर 24 फेब्रुवारी 2021 रोजी 1-0फरकाने मणिपूरमधील संघाविरुद्ध विजय नोंदविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT