मुरगाव बंदर प्रकल्पांची माहिती देताना 570.53 कोटी रुपयांचे 11 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तसेच एकूण 250.37 कोटी रुपयांचे 5 प्रकल्प कार्यान्वित आहेत, तर 842 कोटी रुपयांचा 1 प्रकल्प विकासाधीन आहे व एकूण रुपये 567 कोटींचे 4 प्रकल्प संकल्पनात्मक टप्प्यात असल्याचे मुरगाव बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय यांनी सांगितले.
आज शुक्रवारी एमपीएच्या कॉन्फरन्स सभागृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सागरमालाच्या सात वर्षातील मुरगाव (Mormugao) बंदराच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला. पूर्ण झालेल्या आणि अंमलबजावणी अंतर्गत विविध उपक्रमाद्वारे मुरगाव बंदर प्राधिकरण व्यापार आणि उद्योगाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी वचनबद्ध आणि प्रगतशील असल्याचे एम पी एचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय यांनी सांगितले.
सागर माला कार्यक्रम सरकारने (Government) राबवून भारताच्या 2015 मध्ये क्षमता विस्तार, भारताच्या किनारपट्टी सह समुद्र बंदरांचे आधुनिकीकरण, बंदर नेतृत्व विकासाच्या उद्देशाने आंतरदेशीय आणि किनारी नेव्हिगेशनचा विकास साध्य करण्याच्या उद्देशाने या वर्षी बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय (Ministry) सागर मालाच्या यशस्वी वर्षाचे स्मरण साजरे करत असल्याचे एमपीएचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय यांनी सांगितले. तसेच सागरमाला कार्यक्रमाच्या यशस्वी सात वर्षाच्या स्मरणार्थ मुरगाव बंदर प्राधिकरणाने 30 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या अनुकरणीय कामगिरीचे आणि प्रमुख कार्यक्रमांचे प्रदर्शन होते अशी माहिती जी.पी.राय यांनी सांगितले.
कार्यक्रमा दरम्यान मुरगाव बंदर प्राधिकरणाने बंदराच्या पूर्ण झालेल्या आणि आगामी प्रकल्पांबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी "संस्थात्मक संवाद" हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानंतर बंदर भेट दिली होती. 30 माचॆ रोजी हा कार्यक्रम मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या एचआरडी सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि इन्स्टिट्यूट ऑफ शिपबिल्डिंग अँड टेक्नॉलॉजी, बोगदा आणि दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, एमपीए/हेडलँड सडा येथील सुमारे 40 विद्यार्थ्यांनी संवाद कार्यक्रमात भाग घेतला.
31 मार्च रोजी स्टेकहोल्डर्स मीट आयोजित केली होती. सागरमाला अंतर्गत प्रकल्पांचे स्पष्टीकरण देणारे पीपीटी आणि व्हिडिओचे प्रदर्शन करण्यात आले. विविध संस्था/फर्ममधील सुमारे 25 स्टेकहोल्डर्सनी या मेळाव्यात सक्रिय सहभाग घेतला. उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय, मुरगाव बंदर प्राधिकरण यांनी संबंधितांशी संवाद साधला.तर आज शुक्रवारी एमपीएच्या कॉन्फरन्स सभागृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.