I-League Football Latest News Dainik Gomantak
क्रीडा

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सची अपराजित दौड

I-League Football Latest News : पंजाबवर 2-1 फरकाने मात, गुणतक्त्यात प्रगती

किशोर पेटकर

I-League Football Latest News : चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित दौड कायम राखताना मंगळवारी पंजाब एफसीवर 2-1 फरकाने मात केली. सलग नऊ सामने अपराजित राहत त्यांनी गुणतक्त्यातही प्रगती साधली.

सामना मंगळवारी कोलकात्यातील कल्याणी येथे झाला. विजयाच्या पूर्ण तीन गुणांसह त्यांनी पंजाब एफसीला गाठले. समान 27 गुण झाल्यानंतर गोव्यातील संघ तिसऱ्या स्थानी आला, तर पंजाबचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरला. (I-League Football Latest News)

ब्राईस मिरांडा याने 25व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून देणारा गोल केला. इंग्लिश खेळाडू कर्टिस गथरी याने 56व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे पंजाब एफसीला बरोबरी साधता आली. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना आयव्हरी कोस्टच्या ग्नोहेरे क्रिझो याने केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला विजयी मुसंडी मारता आली.

चर्चिल ब्रदर्सचा धडाका

स्पॅनिश अंतोनियो रुएदा यांच्या मार्गदर्शनाखालील चर्चिल ब्रदर्स संघ आय-लीग स्पर्धेत सलग नऊ सामने अपराजित आहे. या कालावधीत त्यांनी सात सामने जिंकले, तर दोन सामने बरोबरीत राखले. एकंदरीत त्यांनी 15 लढतीत आठ विजय नोंदविले असून तीन सामने बरोबरीत ठेवले, तर चार पराभव पत्करले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT