Churchill Brothers Dainik Gomanatak
क्रीडा

चर्चिल ब्रदर्सला विजयाचा दिलासा

आय-लीग फुटबॉल: ऐजॉलला 2-1 फरकाने नमविले

Kishor Petkar

पणजी: तळात संघर्ष करणाऱ्या चर्चिल ब्रदर्सने (Churchill Brothers) गुरुवारी आयलीग फुटबॉल स्पर्धेत विजयाची नोंद केली. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला व गुणतक्त्यातील स्थानही सुधारले. गोव्यातील संघाने ऐजॉल एफसीवर 2-1 फरकाने मात केली.

चर्चिल ब्रदर्ससाठी महत्त्वाचा असलेला सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झाला. त्यांचे दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. नायजेरियन खेळाडू केनेथ इकेचुक्वू याने 44व्या मिनिटास संघाला आघाडी मिळून दिल्यानंतर ताजिकिस्तानचा आंतरराष्ट्रीय खेळाडू कोमरॉन तुर्सुनोव याने 54-3व्या मिनिटास संघाची स्थिती बळकट केली. तुर्सुनोव सामन्याचा मानकरी ठरला. ऐजॉलचा एकमात्र गोल सॅम्युएल लालमुआनपुईया याने 59व्या मिनिटास थेट फ्रीकिक फटक्यावर नोंदविला.

चर्चिल ब्रदर्सने स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. अन्य एक बरोबरी व चार पराभवासह त्यांचे सात गुण झाले असून बाराव्या स्थानावरून आठव्या क्रमांकावर येणे शक्य झाले. ऐजॉल एफसीला लागोपाठ दोन विजय नोंदविल्यानंतर स्पर्धेतील एकंदरीत पाचवा पराभव पत्करावा लागला. सात लढतीतून सहा गुण कायम राहिल्यामुळे ते नवव्या क्रमांकावर घसरले.

ब्राईस मिरांडा याच्या शानदार क्रॉसपासवर केनेथ याचा हेडर भेदक ठरला आणि चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळाली. पूर्वार्धातील भरपाई वेळेस केनेथच्या असिस्टवर कोमरॉन तुर्सुनोव याने अचूक नेम साधत प्रतिस्पर्धी गोलरक्षकाचा बचाव भेदला. स्पर्धेतील अन्य लढतीत गुरुवारी श्रीनिदी डेक्कनने इंडियन ॲरोजवर 2-1 अशी मात केली, तर सुदेवा दिल्लीला नेरोका एफसीने 1-1असे गोलबरोबरीत रोखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT