I-League Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्स विजयाच्या प्रतीक्षेत

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत ट्राऊ संघाविरुद्ध लढत

किशोर पेटकर

I-League Football Tournament: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला यावेळच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अजून सूर गवलेला नाही. तीन सामन्यानंतरही ते विजयाविना आहेत. त्यांच्याप्रमाणेच सामना जिंकण्यास अपयश आलेल्या टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाविरुद्ध गोव्याच्या संघाचा शनिवारी (ता. 12) सामना होईल.

चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ यांच्यातील सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे खेळला जाईल. गतमोसमातील आय-लीग (I-League Football Tournament) स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिल्या तीन संघांत होते, यंदा मात्र संघर्ष करताना दिसत आहेत.

चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ संघाचे प्रत्येकी तीन लढती खेळल्यानंतर समान एक गुण आहे. दोन पराभव व एक बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. चर्चिल ब्रदर्सला गतविजेत्या गोकुळम केरळाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, नंतर राऊंडग्लास पंजाबविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले, तर सुदेवा दिल्लीविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागला. मागील दोन्ही लढतीत त्यांनी सामन्याच्या अंतिम टप्प्यात गोल स्वीकारावा लागल्यामुळे विजयापासून दूर राहावे लागले.

चर्चिल ब्रदर्स प्रगतीसाठी प्रयत्नशील

आमच्यासाठी अपेक्षित अशी ही सुरवात नाही आणि प्रगती आवश्यक असल्याची आम्हाला जाणीव आहे. खेळाडू खूप मेहनत घेत असून संघात काही बदल करून खराब कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न आहेत आणि चांगल्या निकालाचा विश्वास असल्याचे चर्चिल ब्रदर्सचे सहाय्यक प्रशिक्षक मातेस कॉस्ता यांनी नमूद केले.

ट्राऊ संघाचे सलग दोन पराभव

इंफाळ-मणिपूरमधील ट्राऊ संघ गतमोसमात विजेतेपदाच्या शर्यतीत होता. यंदा पहिल्या लढतीत एक गुण प्राप्त केल्यानंतर त्यांना सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत. आम्हाला सर्व क्षेत्रात प्रगतीची अत्यावश्यकता आहे, मात्र चर्चिल ब्रदर्ससारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आव्हान सोपे नसेल, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक एल. नंदकुमार सिंग यांना वाटते. ब्राझीलियन द्वयी डग्लस सांताना आणि फर्नांडो गोम्स, तसेच मध्यरक्षक गेरार्ड विल्यम्स यांच्या समावेशामुळे ट्राऊ संघाची ताकद वाढण्याचे संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT