Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

Cheteshwar Pujara: टीम इंडियातून वगळताच पुजारा उतरला मैदानात, व्हिडिओ व्हायरल

आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर पुजाराने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Pranali Kodre

Cheteshwar Pujara Social Media Post: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. दरम्यान, कसोटी संघातून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे. त्यामुळे याबद्दल क्रिकेटविश्वात सध्या चर्चा सुरू आहे.

पुजाराला भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याने शनिवारी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका मैदानात काही शॉट्स खेळताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने हार्ट आणि क्रिकेट बॅटचे इमोशी टाकले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.

दरम्यान, पुजाराला जरी भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले असले, तरी तो सध्या २८ जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी तयारी करत आहे.

अपयशाबद्दल झालेली टीका

इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान पार पडलेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यात पुजारालाही फार काही करता आले नव्हते. त्याने पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 27 धावा केल्या होत्या. यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच त्याला संघातून वगळले जाण्याचीही चर्चा सुरू झाली होती.

पुजाराच्या पुनरागमनाबद्दल वडिलांना विश्वास

तथापि, पुजारा पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करेल असा विश्वास त्याचे वडील अरविंद यांनी व्यक्त केला आहे.

पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले की 'तो मानसिकरित्या खूप मजबूत आहे. मी निवडीबद्दल कमेंट करू शकत नाही. पण मी जे पाहिले आहे, तो त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने फलंदाजी करत आहे. खरंतर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघ निवडीनंतर त्याच दिवसापासून नेट्समध्ये खूप मेहनत घेत आहे.'

'त्याने दुलीप ट्रॉफीसाठी तयारी सुरू केली आहे आणि तो काउंटी क्रिकेटमध्येही खेळणे सुरू ठेवेल. वडील आणि त्याचा प्रशिक्षक म्हणून मला असे कोणतेही कारण दिसत नाही की तो पुनरागमन करू शकणार नाही.'

दरम्यान, पुजाराने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 103 कसोटी सामने खेळले असून 43.60 च्या सरासरीने 19 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT