Cheteshwar Pujara | Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS सामन्यापूर्वी पुजाराची टीम इंडियाला 'ग्रेट भेट', BCCI ने शेअर केला स्पेशल व्हिडिओ

Cheteshwar Pujara: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी पुजाराची भेट घेतली.

Pranali Kodre

Cheteshwar Pujara meet Team India ahead of 3rd ODI against Australia:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (27 सप्टेंबर) खेळला जात आहे. हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, या सामन्यासाठी चेतेश्वर पुजारा देखील स्टेडियममध्ये उपस्थित होता.

पुजारा नुकताच काउंटी क्रिकेट खेळल्यानंतर भारतात परतला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी पुजारा भारतीय खेळाडूंनाही भेटला. भारतीय खेळाडू मैदानात सराव करत असताना पुजारा मैदानात आला होता.

यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्याशी बराच वेळ चर्चा करताना दिसले. त्याचबरोबर विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर असे अनेक भारतीय संघातील खेळाडू त्याला भेटले. यावेळी ते त्याच्याबरोबर मस्करी करतानाही दिसले.

हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'तिसऱ्या वनडेसाठी कोण उपस्थित आहे पाहा. भारतीय संघाने स्थानिक खेळाडू पुजाराची भेट घेतली.' राजकोटचे मैदान हे पुजाराचे घरचे मैदान आहे.

दरम्यान, पुजारा सध्या भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात संधी मिळाली नव्हती. पण असे असताना त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले.

त्याने यंदा काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाने नेतृत्वही केले. त्याने या संघाकडून या हंगामात शानदार कामगिरीही केली. त्याने 8 सामन्यांमध्ये 54.08 च्या सरासरीने 649 धावा केल्या. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडेबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 352 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. तसेच स्टीव्ह स्मिथने 74 धावांची खेळी केली, तर डेव्हिड वॉर्नरने 56 धावा केल्या. त्याचबरोबर मार्नस लॅब्युशेन 72 धावा करून बाद झाला.

भारताकडून भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT