Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

Cheteshwar Pujara: कसोटीतून बाहेर झालेल्या पुजाराने वनडे कपमध्ये ठोकलं दुसरं खणखणीत शतक, पाहा Video

Cheteshwar Pujara Century: पुजारा सध्या इंग्लंडमध्ये खेळत असून त्याने वनडे कपमध्ये दुसरे शतक ठोकले आहे.

Pranali Kodre

Cheteshwar Pujara slams 2nd Century in One-Day Cup 2023 for Sussex:

इंग्लंडमध्ये सध्या रॉयल लंडन वनडे कप ही देशांतर्गत लिस्ट ए स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा देखील सामील झाला आहे. तो ससेक्स संघाकडून खेळत असून त्याने या स्पर्धेत शुक्रवारी दुसरे शतक झळकावले आहे.

या स्पर्धेत शुक्रवारी ससेक्स विरुद्ध सोमरसेट यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात ससेक्सने 4 विकेट्सने विजय मिळवला. ससेक्सच्या विजयात पुजाराने शतक झळकावत महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात सोमरसेटने अँड्र्यू उमिद (119) आणि कर्टिक कॅम्फर (101) यांच्या शतकाच्या जोरावर ससेक्ससमोर विजयासाठी 319 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना ससेक्सने 47 धावांवर 2 विकेट्स गमावल्यानंतर पुजारा फलंदाजीला उतरला होता. त्याने टॉम अल्सोपबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

अल्सोप 60 धावांवर बाद झाल्यानंतरही पुजाराने त्याची लय काय ठेवत, खालच्या फळीतील फलंदाजांबरोबर महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. त्याची ऑली कार्टबरोबर (44) देखील 6 व्या विकेटसाठी महत्त्वाची 72 धावांची भागीदारी झाली.

त्यामुळे ससेक्सने 48.1 षटकातच 6 विकेट्स गमावत 319 धावांचे आव्हान पूर्ण केले. पुजाराने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार मारले.

लिस्ट ए मध्ये महत्त्वाचा टप्पा पार

हे पुजाराचे लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील 16 वे शतक होते. तसेच या स्पर्धेतील दुसरे शतक आहे. यावर्षी त्याने नॉर्थहॅम्प्टनशायर विरुद्ध देखील नाबाद 106 धावांची खेळी केली होती. तसेच तो सध्या वनडे कपमध्ये पृथ्वी शॉ (304) पाठोपाठ सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याचे या स्पर्धेत 302 धावा झाल्या आहेत.

याबरोबरच त्याने लिस्ट ए क्रिकेट प्रकारात 5,500 धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याचे आता लिस्ट ए क्रिकेटमध्ये 121 सामन्यांमधील 119 डावात 58.48 च्या सरासरीने 5556 धावा झाल्या आहेत.

कसोटी संघातून बाहेर

दरम्यान, सध्या पुजारा जरी इंग्लंडमध्ये खेळत असला, तरी काही दिवसांपूर्वीच त्याला भारताच्या कसोटी संघातील जागा गमवावी लागली होती. त्याला कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघातून वगळण्यात आले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT