Rameshbabu Pragyananda Dainik Gomantak
क्रीडा

Chess World Cup 2023: प्रज्ञानानंदने गाठली अंतिम फेरी, आता जगातील अव्वल खेळाडूशी होणार मुकाबला!

Chess World Cup 2023: बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदने आश्चर्यकारक कामगिरी केली.

Manish Jadhav

Chess World Cup 2023: बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने सोमवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन रॅपिड गेम अनिर्णित राहिल्यानंतर, टायब्रेकच्या तिसऱ्या गेममध्ये प्रज्ञानानंदने चतुराईने अमेरिकन स्टार फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला.

दरम्यान, या विजयासह 18 वर्षीय प्रज्ञानानंदने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीतला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन असेल. FIDE विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा विश्वनाथन आनंदनंतर प्रज्ञानानंद हा पहिला भारतीय ठरला होता. आता तो फायनलमध्येही पोहोचला आहे. या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या चार भारतीयांपैकी प्रज्ञानानंद हा एकमेव भारतीय आहे.

दुसरीकडे, भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने आर प्रज्ञानानंद अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, ''प्राग अंतिम फेरीत पोहोचला आहे! त्याने टायब्रेकमध्ये फॅबियानो कारुआनाला पराभूत केले आणि आता त्याचा सामना मॅग्नस कार्लसनशी होणार आहे, ही खूप चांगली कामगिरी आहे.''

कोण आहे रमेशबाबू प्रज्ञानंद

रमेशबाबू प्रज्ञानानंद हा भारतीय बुद्धिबळपटू आहेत. चेन्नईच्या प्रज्ञानानंदने 2018 मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवले आहे. ही कामगिरी करणारा तो भारतातील सर्वात तरुण खेळाडू आणि त्यावेळी जगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. या युवा खेळाडूला भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचे मार्गदर्शन लाभले आहे.

रमेशबाबू प्रज्ञानानंदने यापूर्वी मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे

रमेशबाबू प्रज्ञानानंद याने यापूर्वी मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये, त्याने अमेरिकेतील मियामी येथे झालेल्या FTX क्रिप्टो कपच्या अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसनचा 4-2 असा पराभव करुन सर्वांना चकित केले होते. मात्र, त्याला संपूर्ण स्पर्धेत कार्लसनपेक्षा कमी गुण मिळाले आले आणि तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कार्लसनचे 16 मॅच पॉईंट होते तर प्रज्ञानानंदचे 15 मॅच पॉइंट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस झोपेच्‍या मोडमध्‍ये

Arvind Kejriwal Mayem: '..तर मयेवासीयांची पारतंत्र्यातून मुक्तता'! जमीन मालकी हक्कावरुन काय म्हणाले केजरीवाल? Video

Varsha Usgaonkar: 'गोवा हे माझे घर... गोमंतकीय ही माझी माणसे'! अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी उधळली स्तुतीसुमने

Narendra Modi: गोव्याच्या श्रुती आणि रोहितने जिंकले PM मोदींचे मन! म्हापसा ITIचे टॉपर्स; नवी दिल्लीतील विज्ञान भवनात गौरव

‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का'? चाकू दाखवला, मारायला सुरुवात केली; हल्ल्‍यादिवशी नेमके काय घडले? काणकोणकरांनी दिला जबाब

SCROLL FOR NEXT