FC Goa  Dainik gomantak
क्रीडा

चेन्नईयीनचे आव्हान; एफसी गोवासाठी आयएसएलमध्ये कठीण सामना

दोन वेळचा माजी विजेता चेन्नईयीन संघ प्ले-ऑफ फेरीसाठी प्रयत्नशील आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : एफसी गोवाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर डेरिक परेरा यांना विजयाची प्रतीक्षा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने दोन बरोबरी व एक पराभव अशी कामगिरी बजावली. आता इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (football) स्पर्धेच्या आठव्या मोसमातील पुढील लढतीत माजी शिल्ड विजेत्यांसमोर चेन्नईयीन एफसीचे कठीण आव्हान आहे.

एफसी गोवा आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना शनिवारी (ता. 8) बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर खेळला जाईल. एफसी गोवाचे 9 सामन्यांतून 9 गुण असून अजूनही ते गुणतक्त्यात खालच्या भागात आहेत. दोन वेळचा माजी विजेता चेन्नईयीन संघ प्ले-ऑफ फेरीसाठी प्रयत्नशील आहे. 9 लढतीतून त्यांनी 14 गुणांची कमाई केली आहे. शनिवारी एफसी गोवास हरविले, तर चेन्नईचा संघ पहिल्या चार संघात जागा पटकावेल. सध्याचा फॉर्म लक्षात घेता, बोझिदार बँडोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे पारडे जड आहे.

चेन्नईयीनचा सावध पवित्रा

चेन्नईयीनला दोन पराभवानंतर जमशेदपूरला एका गोलने निसटते हरविताना संघर्ष करावा लागला. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षक बँडोविच यांचा पवित्रा सावध आहे. एफसी गोवा संघ धोकादायक आहे. ते प्रतिहल्ला करू शकतात, त्यामुळे आव्हान रोखण्यासाठी आपल्या संघाला बचावात सक्त राहावे लागेल, असे बँडोविच यांनी शुक्रवारी सांगितले. एफसी गोवाच्या मध्यफळीत चांगला खेळ करणारे खेळाडू आहे, असे चेन्नईयीनच्या प्रशिक्षकाने नमूद केले. लिथुआनियन आघाडीपटू नेरियूस वाल्सकिस सामील झाल्यामुळे चेन्नईयीनचे आक्रमण अधिक धारदार होण्याचे संकेत आहेत.

एफसी गोवाचा खेळाडूंवर विश्वास

एफसी गोवाने (goa) मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध झुंजार कामगिरी केली. दोन गोलच्या पिछाडीवरून त्यांनी बरोबरी नोंदविली. स्पॅनिश होर्गे ओर्तिझचे सातत्य कायम आहे, तर कर्णधार एदू बेदियानेही थेट कॉर्नर फटक्यावर अफलातून गोल केला होता. आपला संघ चांगला आहे, त्यामुळे सध्या तरी संघ मजबूत करण्यासाठी आम्हाला आणखी खेळाडूंचे गरज नाही. आमच्या खेळाडूंची पाठराखण करणे आवश्यक आहे. पुढील टप्प्याचा विचार करता, खेळाडू तरबेज आहेत, असे डेरिक यांनी खेळाडूंवर विश्वास प्रदर्शित करताना सांगितले.

एटीके मोहन बागानसमोर ओडिशाचे आव्हान

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गतउपविजेत्या एटीके मोहन बागानसमोर ओडिशा एफसीचे आव्हान असेल. प्रत्येकी 9 सामने खेळल्यानंतर एटीके मोहन बागानचे 15, तर ओडिशाचे 13 गुण आहेत. दोन्ही संघ प्ले-ऑफ फेरीसाठी दावेदार असल्याने शनिवारचा सामना रंगतदार होण्याचे संकेत आहेत. हुआन फेरांडो यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर एटीके मोहन बागानने पराभव स्वीकारलेला नाही. दोन विजयानंतर मागील लढतीत त्यांनी हैदराबादविरुद्ध (Hyderabad) 2-2 गोलबरोबरी नोंदविली. ओडिशाने अगोदरच्या लढतीत गतविजेत्या मुंबई सिटीचा 4-2 असा पराभव केला होता. यलो कार्ड निलंबनामुळे एटीके मोहन बागान आक्रमणातील प्रमुख खेळाडू ह्यूगो बुमूस याच्याविना मैदानात उतरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT