CSK Players Kids Dainik Gomantak
क्रीडा

Ziva Playing Football Video Viral: CSK खेळाडूंच्या सरावादरम्यान चिमुकल्यांचाच रंगला खेळ, धोनीची झिवा फुटबॉलमध्ये मग्न

चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंची मुलांचा एक गोड व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यात धोनीची मुलगी झिवाही फुटबॉल खेळताना दिसत आहे.

Pranali Kodre

MS Dhoni’s Daughter Ziva Playing Football Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सध्या सुरू असून या स्पर्धेतील विविध व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत असतात.

कधी खेळाडूंच्या मैदानातील अफलातून कामगिरीचे, कधी भन्नाट झेलाचे, कधी सामन्यानंतरच्या मजामस्तीचे, तर कधी वादाचेही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

पण हा व्हिडिओ खेळाडूंचा नाही, तर चेन्नई सुपर किंग्स संघाच्या खेळाडूंच्या मुलांचा आहे. चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये चेन्नई संघातील खेळाडू एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) नेटमध्ये सराव करत असताना त्यांची मुलं खेळण्यात व्यस्त असल्याचे दिसते.

या व्हिडिओमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची 8 वर्षांची मुलगी झिवाही दिसत आहे. ती दोन पाण्याच्या बाटल्यांचे गोलपोस्ट करून फुटबॉल खेळताना दिसत आहे. तसेच तिचे लांबून धोनी निरिक्षणही करताना दिसत आहे.

याशिवाय चेन्नईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाही त्याचा मुलगी नीलबरोबर क्रिकेट खेळतानाही दिसत आहे. यावेळी नील फिल्डिंगचा सराव करताना आणि फलंदाजी करताना दिसत आहे.

त्याचबरोबर चेन्नईचा अष्टपैलू मोईन अलीचा मुलगाही यष्टीरक्षणाचे कौशल्य दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रॉबिन उथप्पा क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो बऱ्याचदा चेन्नई संघाबरोबर दिसतो, तसेच चेन्नईला पाठिंबा देतानाही दिसतो. त्यामुळे यावेळीही तो संघाचा भाग नसला तरी चेपॉक स्टेडियमवर दिसला होता.

धोनीला कुटुंबाचे प्रोत्साहन

खरंतर धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा गेल्या अनेक वर्षांपासून त्याला पाठिंबा देण्यासाठी नेहमी स्टेडियममध्ये उपस्थित असतात. पण यंदा सुरुवातीला या दोघीही स्टेडियममध्ये दिसल्या नव्हत्या.

पण अखेर 6 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी साक्षी आणि झिवा चेन्नईत दाखल झाल्या आणि त्या या सामन्यासाठी चेन्नईला आणि धोनीला प्रोत्साहन देण्यासाठी चेपॉक स्टेडियममध्येही उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर धोनीचे मित्रमंडळीही स्टेडियममध्ये उपस्थित होती.

चेन्नईची चांगली कामगिरी

चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी या हंगामात चांगली झाली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच 4 सामने पराभूत झाले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे चेन्नई 13 गुणांसह सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT