CSK vs SRH: आयपीएल 2023 च्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईचे 8 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला सात विकेट्सवर केवळ 134 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने डेव्हॉन कॉनवेच्या अर्धशतकाच्या बळावर 7 चेंडू राखून सामना जिंकला.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली. ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पॉवरप्लेमध्येच 60 धावा केल्या.
दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 66 चेंडूत 87 धावांची भागीदारी झाली. ऋतुराज गायकवाड 30 चेंडूत 35 धावा करुन धावबाद झाला. तर अजिंक्य रहाणेने 9 धावांचे योगदान दिले.
तसेच, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 134 धावा केल्या.
हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 3, महिश, आकाश आणि पाथिरानाने 1-1 बळी घेतला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली. संघाने पहिल्या 4 षटकात 34 धावा केल्या. पण हॅरी ब्रूक 5व्या षटकात 18 धावा काढून बाद झाला.
अभिषेक 26 चेंडूत 34 धावा करुन बाद झाला. यानंतर हैदराबादने वारंवार अंतराने विकेट्स गमावल्या. राहुल त्रिपाठी 21, कर्णधार एडन मार्करामने 12 धावांचे योगदान दिले.
हेन्रिक क्लासेन 17 धावा करुन बाद झाला. मयंक अग्रवाल केवळ दोन धावा करु शकला. वॉशिंग्टन सुंदरने 9 धावा केल्या. तर मार्को जॅनसेन 17 धावांवर नाबाद राहिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.