पणजी: माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीने (Chennaiyin FC) इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात मागील पराभवातून सावरताना रविवारी जमशेदपूर एफसीवर (Jamshedpur FC) 1-0 फरकाने निसटता विजय मिळविला. सामना बांबोळी (Bambolim) येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला.
सामन्यातील निर्णायक गोल 31व्या मिनिटास आघाडीपटू लुकास गिकिएविच (Lukasz Gikiewicz) याने नोंदविला. पोलंडच्या या 34 वर्षीय खेळाडूचा आयएसएल (ISL) स्पर्धेतील हा पहिलाच गोल ठरला. जमशेदपूरने तुल्यबळ लढत दिली, पण पूर्वार्धात गोल स्वीकारल्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला.
चेन्नईयीनने रविवारी विजय मिळविला, पण पहिल्या चार संघात स्थान मिळविणे त्यांना शक्य झाले नाही. नऊ लढतीतील त्यांचा हा चौथा विजय ठरला. त्यांचे आता 14 गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) व एटीके मोहन बागान (ATK Mohun Bagan) यांचेही समान 14 गुण आहे. गोलसरासरीत केरळा ब्लास्टर्स तिसऱ्या, एटीके मोहन बागान चौथ्या, तर चेन्नईयीनला पाचवा क्रमांक मिळाला. जमशेदपूरला स्पर्धेतील दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नऊ लढतीनंतर त्यांचे 13 गुण कायम राहिले व त्यांना सहाव्या स्थानी घसरावे लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.