Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'हा' रेकॉर्ड करण्यापासून हिट मॅन फक्त 29 धावा दूर!

World Cup 2023: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकीकडे टीम इंडियाने यावेळी चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे, तर दुसरीकडे रोहित शर्माची बॅटही चांगली तळपत आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत त्याच्या छोट्या खेळी प्रभावी ठरल्या आहेत. रोहित शर्मा क्रीझवर येताच तो विरोधी संघाच्या गोलंदाजांवर हल्ला करतो, ज्यामुळे विरोधी संघात घबराट निर्माण होते. तर इतर फलंदाजांनाही वातावरण समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळतो.

हेच कारण आहे की, शुभमन गिल आणि विराट कोहलीपासून ते केएल राहुल आणि श्रेयस अय्यरपर्यंत सर्वजण नंतर आल्यावर शानदार कामगिरी करतात. दरम्यान, अंतिम फेरीत रोहित शर्माची छोटीशी खेळी त्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल.

केन विल्यमसनने एकदिवसीय विश्वचषकाच्या एका मोसमात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत

एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, एका मोसमात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून त्याने 2019 च्या विश्वचषकात 578 धावा केल्या होत्या. रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) बोलायचे झाल्यास, त्याने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत 550 धावा केल्या आहेत.

म्हणजेच 19 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने आणखी 29 धावा केल्या तर तो केन विल्यमसनला मागे टाकेल. रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळतो, त्याच्यासाठी हा आकडा फार मोठा नाही. 29 धावा करुन तो विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनेल.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने 2007 मध्ये कर्णधार म्हणून 548 धावा केल्या होत्या. तर 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग 539 धावा करण्यात यशस्वी ठरला होता. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने 507 धावांचा आकडा गाठला होता.

तर 2015 मध्ये एबी डिव्हिलियर्सने 482 धावा केल्या होत्या. 2003 मध्ये जेव्हा टीम इंडिया विश्वचषकाच्या (World Cup) फायनलमध्ये पोहोचली तेव्हा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने 465 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने या सर्वांना मागे टाकले असून आता तो केन विल्यमसनलाही मागे टाकण्यात यशस्वी होतो का हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT