Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 2nd T20I: 'त्यांनी जबाबदारी घ्यायला हवी', कॅप्टन हार्दिकची भारताच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर आगपाखड

Hardik Pandya: भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसऱ्या टी20 सामन्यातील पराभवामागील कारण कर्णधार हार्दिक पंड्याने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya on India's 2nd T20I lost Against West Indies: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात रविवारी (6 ऑगस्ट) टी20 मालिकेतील दुसरा सामना प्रोविडेन्स स्टेडियम, गयाना येथे पार पडला. या रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजने २ विकेट्सने आणि 7 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यातील पराभवासाठी भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजांना दोषी ठरवले आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजसमोर 153 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 18.5 षटकात 8 विकेट्स गमावत 155 धावा करून पूर्ण केला.

या पराभवानंतर हार्दिक म्हणाला, 'जर खरं सांगायचे, तर फलंदाजांची कामगिरी चांगली नव्हती. आम्ही चांगली फलंदाजी करू शकत होतो. 160 पेक्षा जास्त किंवा 170 चांगली धावसंख्या असती.'

'सध्याच्या संघसंयोजनानुसार आम्हाला पहिल्या 7 फलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल की ते चांगले प्रदर्शन करतील आणि आशा करावी लागेल की गोलंदाज तुम्हाला सामना जिंकवतील. फलंदाजांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल.'

तसेच भारताकडून अर्धशतक करणाऱ्या तिलक वर्माचे मात्र हार्दिकने कौतुक केले आहे. तो म्हणाला, 'त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली, अशीच आम्हाला अपेक्षा होती. चार क्रमांकावर डाव्या हाताचा खेळाडू उतरल्याने विविधता मिळते. युवा खेळाडू निरडता आणि आत्मविश्वास घेऊन येत आहेत.'

त्याचबरोबर वेस्ट इंडिजने 2 धावांवर 2 विकेट्स गमावल्यानंतर निकोलस पूरनने केलेल्या ताबडतोड अर्धशतकाबद्दलही त्याचे कौतुक केले. हार्दिक पूरनबद्दल म्हणाला, 'तो ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, त्यामुळे फिरकी गोलंदाजांना रोटेट करणे कठीण झाले होते. 2 धावांवर 2 विकेट्स नंतर त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे सामना त्यांच्यबाजूने झुकला.'

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून तिलक वर्माने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तसेच इशान किशनने 27 धावा आणि हार्दिक पंड्याने 24 धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही खास काही करता आले नाही. वेस्ट इंडिजकडून अकिल होसेन, अल्झारी जोसेफ आणि रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने ४० चेंडूत 67 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार रोवमन पॉवेलने 21 धावा आणि शिमरॉन हेटमायरने 22 धावांची खेळी केली.

अखेरीस 9 व्या विकेटसाठी अकिस होसेन आणि अल्झारी जोसेफ यांनी नाबाद 26 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला. भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच युजवेंद्र चहलन 2 विकेट्स घेतल्या, तसेच अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT