HS Prannoy Dainik Gomantak
क्रीडा

BWF World Tour Finals: एचएस प्रणॉयचा 'या' ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभवाचा मोठा धक्का!

वर्ल्ड बॅडमिंटन फायनल्स 2022 स्पर्धेत एचएस प्रणॉयने ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभवाचा धक्का दिलायं

Pranali Kodre

BWF World Tour Finals: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने वर्ल्ड बॅडमिंटन फायनल्समध्ये तिसऱ्या सामन्यात शुक्रवारी जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाच्या व्हिक्टर एक्सेलसेनला 14-21, 21-17, 21-18 अशा फरकाने पराभूत केले.

प्रणॉयसाठी हा या स्पर्धेतील अखेरचा सामना ठरला. कारण या स्पर्धेतील त्याचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. पण त्याने अखेरचा सामना जिंकला असल्याने यावर्षीच्या हंगामाचा त्याने विजयी शेवट केला आहे.

प्रणॉयने केवळ दुसऱ्यांदाच ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेनला पराभूत केले आहे. यापूर्वी त्याने 2021 साली इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत त्याला पराभवाचा धक्का दिला होता.

(HS Prannoy beat world number 1 Viktor Axelsen)

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात एक्सेलसेनने चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिला सेट 21-14 अशा फरकाने सहज जिंकला होता. पण दुसऱ्या सेटमध्ये प्रणॉयने चांगले पुनरागमन केले आणि एक्सेलसेनला संघर्ष करायला भाग पाडले. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही स्पर्धकांमध्ये चांगली लढत झाली. पण अखेर प्रणॉयने दुसरा सेट 21-17 असा जिंकत सामन्यातील आव्हान राखले.

त्यामुळे तिसरा सेट निर्णयाक ठरणार होता. या सेटमध्येही प्रणॉयने त्याची लय कायम ठेवत सुरुवातीलाच आघाडी मिळवली होती. पण एक्सेलसेननेही त्याला ही आघाडी सहज टिकवून ठेवू दिली नाही. पण प्रणॉयने शांत राहत हा सेट हातून जाणार नाही याची काळजी घेतली. त्याने हा सेट 21-18 अशा फरकाने जिंकून हा सामनाही आपल्या नावावर केला.

पण, या सामन्यात पराभव झाला असला, तरी एक्सेलसेन पुढच्या फेरीत पोहचला आहे. मात्र, प्रणॉयला या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.

प्रणॉय पहिल्या सामन्यात जपानच्या कोडाई नाराओकाविरुद्ध पराभूत झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्याला चीनच्या लू गुयांग झूने पराभूत केले होते. प्रणॉय कारकिर्दीत पहिल्यांदाच वर्ल्ड बॅडमिंटन फायनल्समध्ये पोहोचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

SCROLL FOR NEXT