Rishi Sunak Dainik Gomantak
क्रीडा

अन् इंग्लंडच्या वेगवान बॉलरनं घेतली चक्क पंतप्रधानांचीच विकेट, Video Viral

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक टी20 विश्वविजेत्या खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Rishi Sunak plays cricket with England Team: इंग्लंड क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये पार पडलेला टी20 वर्ल्डकप नोव्हेंबर 2022 मध्ये जिंकला होता. या वर्ल्डकप विजयाचे सेलिब्रेशन आता इंग्लंडने चार महिन्यांनी पतंप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजेच 10 डावनिंग स्ट्रिट येथे केले आहे. विशेष म्हणजे यावेळी खुद्द इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबर इंग्लंड संघानं क्रिकेटही खेळण्याचा आनंद घेतला.

इंग्लंडचे टी20 विश्वविजेते खेळाडू कर्णधार जोस बटलरसह ऋषी सुनक यांच्या भेटीला गेले होते. यावेळी सर्वांनी जेवणाचा आनंदही घेतला. दरम्यान, यावेळी मुळ भारतीय वंशाचे असलेल्या ऋषी सुनक यांनी इंग्लंड क्रिकेटपटूंबरोबर फलंदाजी आणि गोलंदाजीही केली. या घटनेचा व्हिडिओ सध्याच चांगलाच व्हायरल होत आहे.

ऋषी सुनक क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सरेच्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की इंग्लंडचे खेळाडू फॉर्मल वेशात म्हणजेच सुटाबुटात आहेत. तसेच सुनक यांनीही फॉर्मल शर्ट-पँट आणि टाय परिधान केलेला आहे. याच फॉर्मल वेशात सर्व क्रिकेट खेळत आहेत.

सुनक यांनी ख्रिस जॉर्डन आणि सॅम करन यांच्या गोलंदाजीचा सामना केला. यावेळी सॅम करन जो मुळात वेगवान गोलंदाज आहे. त्याने सुनक यांच्याविरुद्ध फिरकी गोलंदाजी केली. त्याने टाकलेला चेंडू सुनक यांनी सोडला.

त्यानंतर ख्रिस जॉर्डनच्या चेंडूने मात्र सुनक यांची विकेट घेतली. जॉर्डनने टाकलेल्या चेंडूने सुनक यांच्या बॅटची कड घेतली. त्यामुळे ते स्लीपमध्ये झेलबाद झाले. त्यावर जॉर्डनने सेलिब्रेशनही केले. यानंतर सुनक हे गोलंदाजीही करताना दिसले. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांच्या पसंतीसह हा व्हिडिओ उतरत आहे.

दरम्यान, 10 डावनिंग स्ट्रिट येथे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतल्यानंतरचे फोटो इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनेही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघातील सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, फिल सॉल्ट, ख्रिस वोक्स आणि रिचर्ड ग्लिसन आणि टायमल मिल्स हे खेळाडूही दिसत आहेत.

इंग्लंडने गेल्यावर्षी टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात जोस बटलरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला होता. याबरोबरच दुसऱ्यांदा टी२० वर्ल्डकप जिंकला होता. सध्या इंग्लंड असा एकमेव संघ आहे, जे एकाचवेळी सध्या वनडे आणि टी२० वर्ल्डकप विजेते आहेत. इंग्लंडने 2019 साली झालेला अखेरचा वनडे वर्ल्डकपही जिंकलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT