Ashish Nehra & Rishi Sunak
Ashish Nehra & Rishi Sunak Daink Gomantak
क्रीडा

Rishi Sunak Memes: ऋषी सुनक पंतप्रधान होताच आशिष नेहरा अन् कोहिनूर हिऱ्याची सोशल मीडियावर चलती

दैनिक गोमन्तक

Memes on Britain New PM Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. ऋषी सुनक यांच्या या कामगिरीवर भारतातील लोकही खूश आहेत आणि सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्याच वेळी, काही लोक आहेत, ज्यांनी ऋषी सुनक पंतप्रधान झाल्याची पुष्टी होताच त्यांच्यावर मीम्स बनवण्यास सुरुवात केली आहे. मीम्स देखील भारताशी निगडित आहेत. ते असे आहेत की, ते पाहून लोक हसणे थांबवू शकत नाहीत. ऋषींवर बनवलेले सर्व मीम्स वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्येही सर्वात खास भारतीय माजी क्रिकेटपटू आशिष नेहराशी संबंधित आहे.

आशिष नेहराच्या पोस्टरवर ऋषींचे अभिनंदन

खरं तर, 42 वर्षीय ऋषी सुनक आणि टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटर आशिष नेहरा (Ashish Nehra) यांचा चेहरा खूप सारखा आहे. अशा परिस्थितीत अनेक यूजर्स ऋषी सुनक यांच्याऐवजी आशिष नेहराचा फोटो मीम्स म्हणून वापरुन ट्विट करत अभिनंदन करत आहेत. काही लोक आशिष नेहराच्या डान्स व्हिडिओचा वापर करत आहेत की, ऋषी सुनक पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर डान्स करत आहेत.

कोहिनूर हिरा परत आणण्याचीही योजना होती

सुनक ऋषी हे हिंदू असून त्यांनी भगवद्गीतेतील श्लोकांचाही उल्लेख केला आहे. ते दिवाळी सुध्दा साजरी करतात. त्यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून यॉर्कशायरचे खासदार म्हणून शपथ घेतली होती. त्यांची मुळे भारतीय संस्कृतीत असल्याने काही वापरकर्त्यांनी मीम्सच्या माध्यमातून कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याची योजना आखली आहे.

ऋषी हे इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांचे जावई

ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे (Infosys) प्रमुख नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. अशा परिस्थितीत ट्विटर युजर्सनीही या गोष्टीचा वापर करुन अनेक मीम्स तयार केले आहेत. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. यूकेचे माजी अर्थमंत्री सुनक उद्या किंग चार्ल्स यांची भेट घेतील आणि त्यानंतर अधिकृतपणे यूकेचे पंतप्रधानपद स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रशांत महासागरातील उष्ण वाऱ्यामुळे जगभरात उष्णता वाढली; गोवाही घामाघूम; आर्द्रता 94 टक्क्यांवर पोहोचली

CM Pramod Sawant: खंडणीबहाद्दर ‘NGO' ना बसणार चाफ; मुख्यमंत्री सावंत यांनी दिला थेट कारवाईचा इशारा!

लाला की बस्तीतून 96 जणांना अटक; कोलवाळ पोलिसांची भाडेकरुंची तपास मोहीम

Viral Video: ‘’त्या गर्भवती असू शकतात’’, इस्रायली महिला सैनिकांच्या अपहरणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

Yuri Alemao: रोजगार मंत्री उत्तर द्या; फार्मा कंपनीच्या मुलाखतीवरुन विरोधी पक्षनेते आलेमाव यांचे बाबूशना प्रश्न

SCROLL FOR NEXT