Moments of the match between Dempo Club and FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

I-League 2 : धेंपो क्लबची विजयी सलामी

ब्रायन फारियाच्या गोलमुळे एफसी गोवावर मात

किशोर पेटकर

I-League 2 : ब्रायन फारिया हा एफसी गोवा डेव्हलपमेंट संघातील माजी खेळाडू. त्याने आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध केलेल्या गोलमुळे धेंपो स्पोर्टस क्लबला द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात विजयी सलामी देता आली. सामना बुधवारी एला-जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर झाला.

फारिया याने 45+1व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. कीर्तीकेश गडेकरच्या असिस्टवर 26 वर्षीय खेळाडूचे हेडिंग रोखणे एफसी गोवाचा गोलरक्षक हॅन्सेल कुएल्हो याला शक्य झाले नाही.

एफसी गोवा डेव्हपलमेंट संघाचा पुढील सामना 19 मार्च रोजी अहमदाबाद येथील शाहीबाग पोलिस स्टेडियमवर एआरए एफसी संघाविरुद्ध होईल. बुधवारी झालेल्या लढतीत अहमदाबादच्या संघाने पूर्ण तीन गुण प्राप्त करताना हैदराबाद एफसीला 2-1 फरकाने हरविले. धेंपो क्लबचा स्पर्धेतील पुढील सामना 25 मार्च रोजी हैदराबाद येथे हैदराबाद एफसी संघाविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT