Neymar Jr. Dainik Gomantak
क्रीडा

Neymar Jr: रोनाल्डोनंतर आता नेमारवर सौदीतील फुटबॉल क्लबचा धनवर्षाव; संघात घेण्यासाठी मोजले तब्बल 800 कोटी...

Neymar Jr: रोनाल्डोपाठोपाठ नेमारनेही सौदीचा रस्ता धरत मोठ्या क्लबशी करार केला आहे.

Pranali Kodre

Neymar jr signs for Saudi Arabian football club Al Hilal:

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू ज्युनियर नेमारचे नाव युरोपियन फुटबॉलमध्ये नेहमीच गाजले आहे. पण आता तो सौदी अरेबियामध्ये त्याचा जलवा दाखवण्यास सज्ज आहे. नेमारने सौदी अरेबियामधील अल हिलाल क्लबबरोबर करार केला आहे. याबद्दल अल हिलालने अधिकृत माहिती दिली आहे.

त्यामुळे नेमारचा आता फ्रान्समधील प्रसिद्ध क्लब पॅरिस सेंट-जर्मेनसोबतचा प्रवास संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या सौदी अरेबियामधील फुटबॉलकडे अनेक मोठे फुटबॉलपटू वळल्याचे दिसले आहे. त्याच आता रोनाल्डोचाही समावेश आहे.

दरम्यान, अल हिलाल क्लबने नेमारबरोबर किती रुपयांचा करार केला असल्याचे उघड केलेले नाही. मात्र, अनेक रिपोर्ट्सनुसार 90 मिनियन युरोपेक्षा अधिकचा (साधारण 800 कोटी रुपयांहून अधिक) करार झाला आहे. तसेच हा २ वर्षांचा करार आहे.

या कराराबद्दल नेमार म्हणाला, 'मी युरोपमध्ये खूप यश मिळवले आणि आनंद घेतला. पण मला नेहमीच जागतिक खेळाडू व्हायचे होते आणि मला नवनवीन ठिकाणी नवी आव्हानासमोर आणि संधींसमोर स्वत:ला तपासायचे होते.' तसेच त्याने सौदी प्रो लीगमध्ये खेळण्याबद्दल उत्सुक असल्याचेही सांगितले.

31 वर्षीय नेमार गेल्या अनेक वर्षांपासून युरोपियन फुटबॉलमध्ये खेळत होता. त्याने बार्सिलोना क्लब आणि पॅरिस सेंट-जर्मेन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017 मध्ये त्याने बार्सिलोना संघाची साथ सोडत पॅरिस सेंट-जर्मेन क्लबमध्ये सामील झाला होता. त्यावेळी त्याच्यासाठी 222 मिलियनचा विक्रमी करार झाला होता.

पॅरिस सेंट-जर्मेनसाठी त्याने 173 सामन्यात 118 गोल केले आणि 5 लीग विजेतीपदेही मिळवली. आता तो सौदीमधील क्लबमध्ये सामील झाला आहे.

यापूर्वी गेल्यावर्षी पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियातील अल-नासर क्लबबरोबर करार केला होता, ज्याची मोठी चर्चा झाली होती. नुकतीच त्याने अल नासर संघाकडून शनिवारी अरब क्लब चॅम्पियन्स कप 2023 स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT