Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: 'हा' रेकॉर्ड करताच किंग कोहली बसणार सचिन-पाँटिंगच्या पंक्तीत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मोठा विक्रम करत सचिन-पाँटिंगच्या यादीत सामील होण्याची विराट कोहलीला संधी आहे.

Pranali Kodre

Virat Kohli: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून बॉर्डर - गावसकर ट्रॉफी म्हणजेच 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेदरम्यान भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

या मालिकेत विराटने जर 64 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा टप्पा पार करेल. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण करणारा जगातील सहावा आणि भारताचा दुसराच खेळाडू ठरेल.

भारताकडून यापूर्वी केवळ मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 शतकांसह 34357 धावा केल्या आहेत. सध्या विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 546 सामन्यांमध्ये 74 शतकांसह 24936 धावांची नोंद आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

34357 धावा - सचिन तेंडुलकर

28016 धावा - कुमार संगकारा

27483 धावा - रिकी पाँटिंग

25957 धावा - माहेला जयवर्धने

25534 धावा - जॅक कॅलिस

24936 धावा - विराट कोहली

विराटला कसोटी शतकाची प्रतिक्षा

विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून या वर्षात आत्तापर्यंत त्याने दोन शतकेही केली आहेत. पण ही शतके त्याने वनडेत केली आहेत. मात्र, त्याला आता त्याच्या 28 व्या कसोटी शतकाची प्रतिक्षा आहे. त्याने अखेरचे कसोटी शतक म्हणजेच 27 वे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये केले होते. त्यानंतर त्याला गेल्या तीन वर्षांमध्ये कसोटीत शतक करता आलेले नाही.

विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत आत्तापर्यंत 20 सामने खेळले आहेत. 48.05 सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

दरम्यान, विराटने जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतके केली, तर तो भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारा दुसरा फलंदाज ठरेल, तसेच सुनील गावसकरांच्या ८ शतकांच्या विक्रमाला मागे टाकेल. या यादीत अव्वल क्रमांकावर ११ शतकांसह सचिन तेंडुलकर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT