Mahendra Singh Dhoni And Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: स्पर्धेपूर्वी 'या' संघांसाठी आली मोठी बातमी, धाकड गोलंदाजांची होणार एन्ट्री!

IPL 2023: न्यूझीलंड दौऱ्यानंतर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकेने खेळाडूंना एनओसी जारी केली आहे.

Manish Jadhav

Indian Premier League 2023: आयपीएल 2023 चा हंगाम 31 मार्चपासून सुरु होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होईल, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ची 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सशी लढत होईल.

या संघांसाठी आनंदाची बातमी

आयपीएल सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई सुपर किंग्जबरोबर पंजाब किंग्जसाठी (Punjab Kings) आनंदाची बातमी आली आहे. या संघात श्रीलंकन ​​संघाचे 4 गोलंदाज खेळताना दिसणार आहेत.

यापूर्वी असे बोलले जात होते की, श्रीलंकेच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी बोर्डाकडून एनओसी देण्यात आलेली नाही, त्यामुळे खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची स्थिती स्पष्ट केली आहे.

श्रीलंका क्रिकेटने परवानगी दिली

डेली मिररच्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, आयपीएलसाठी (IPL) आम्ही आमच्या खेळाडूंना एनओसी दिली आहे, परंतु हे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यानंतर आयपीएलमध्ये खेळू शकतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

या खेळाडूंचा समावेश असेल

श्रीलंकेचे चार गोलंदाज आयपीएलमध्ये सामील होतील. वानिंदू हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु), महिश तिक्षना आणि मथिशा पाथिराना (चेन्नई सुपर किंग्स) न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्यांच्या आयपीएल फ्रँचायझींमध्ये सामील होतील, तर भानुका राजपक्षे (पंजाब किंग्स) संपूर्ण आयपीएल हंगामासाठी असेल. श्रीलंकेचा संघ सध्या न्यूझीलंडमध्ये असून या संघाचा दौरा 8 एप्रिल रोजी संपणार असून, त्यानंतर हे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT