रवी शास्त्रींनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांना याबाबत सूचना दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
रवी शास्त्रींनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांना याबाबत सूचना दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup नंतर टीम इंडियात मोठ्या बदलाची शक्यता

दैनिक गोमन्तक

टी -20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) टीम इंडियामध्ये मोठे बदल होणार (Big changes in Team India) असल्याचे वृत्त समोर येत आहे. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, (Head Coach Ravi Shastri) फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर (Batting coach Vikram Rathore, bowling coach Bharat Arun and fielding coach R. Sridhar) यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला ‘बाय बाय’ म्हणणार आहेत. तसेच या सर्वांचा करार टी -20 विश्वचषकानंतर संपणार देखील आहे. रवी शास्त्री टी -20 विश्वचषकानंतर बाहेर गेल्यास भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा प्रशिक्षक पदासाठी पहिली पसंती असेल.

रवी शास्त्रींनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांना याबाबत सूचना दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. टी-20 विश्वचषकानंतर आपण प्रशिक्षक पदावरुन दूर होण्याचा मी विचार करत आहे. टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कारार संपुष्टात येत आहे. पण तो पुढे वाढविण्यास त्यांची इच्छा नाही.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 60 इतकी निश्चित केली आहे.

वयाच्या 59 व्या वर्षी शास्त्रींना संघाचे प्रशिक्षकपद मिळाले, त्यामुळे त्यांना आणखी एक संधी आहे. परंतु माध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार शास्त्री आपला प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ पुढे वाढविण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक दोघेही इतर पर्याय शोधण्यासाठी तयार आहेत.

तर बीसीसीआय देखील आता शास्त्रींसोबत भारतीय संघाचे भविष्य पाहत नाही.

टी -20 विश्वचषकानंतर, बीसीसीआय नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्जाची मागणी करेल. बोर्डाची एक समिती हे अर्ज शॉर्टलिस्ट करुन उमेदवारांची मुलाखत घेईल आणि भारताच्या नवीन कोचिंग स्टाफची निवड होईल.

केवळ शास्त्रीच नाही तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनाही भारतीय संघातील त्यांच्या भूमिका संपवायच्या आहेत. या तिघांनी आधीच आयपीएलच्या अनेक संघांशी चर्चा देखील केली असल्याचे बोलले जात आहे.

2014 मध्ये रवी शास्त्री यांना प्रथम संघाचे व्यवस्थापक बनवण्यात आले. 2016 च्या टी -20 विश्वचषकापर्यंत ते या भूमिकेतच होते. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताला पराभावाचा सामना करावा लागल्यानंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळासंपला त्यानंतर शास्त्रींना प्रशिक्षक बनवण्यात आले.

काही अधिकाऱ्यांनी राहुल द्रविडला प्रशिक्षकासाठी सर्वोत्तम पर्याय मानले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यावर माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत होते. Under 19 आणि भारतीय 'अ' संघ आणि एनसीएमध्ये द्रविडने चांगले काम केले आहे. तसेच संघातील अनेक खेळाडूंशी त्यांचा परिचय देखील चांगला आहे. त्यामुळे द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य असेल. द्रविडचा एनसीएसोबतचा करार सप्टेंबरमध्ये संपत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT