Bhaichung Bhutia Dainik Gomantak
क्रीडा

Birthday Special: भारतीय फुटबॉल नव्या उंचीवर नेणाऱ्या बायचुंग भुतियाबद्दल 'या' 5 गोष्टी माहितीयेत का?

Bhaichung Bhutia: बायचुंग भुतिया 15 डिसेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Pranali Kodre

भारताचा माजी फुटबॉलपटू बायचूंग भुतिया 15 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. भुतियाने भारतीय फुटबॉलला एक वेगळी ओळख दिली होती आणि एका वेगळ्या उंचीवर पोहचवले होते. तो आजही भारताच्या यशस्वी आणि दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये गणला जातो.

Bhaichung Bhutia

प्रोफेशनल फुटबॉलमध्ये इस्ट बंगालकडून 1993 साली त्याने पदार्पण केले होते. त्यानंतर दोनच वर्षाच त्याने भारताकडूनही पदार्पण केले. त्यानंतर त्याने जवळपास 16 वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने काही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले.

Bhaichung Bhutia

भुतिया भारताकडून गोल करणारा सर्वात युवा फुटबॉलपटू होता. त्याने 18 वर्षे 90 दिवसाचा असताना पहिला गोल केला होता. पण त्याचा हा विक्रम नंतर जेरी झिसंगाने मोडला. तसेच त्याच्या नावावर भारतीय देशांतर्गत फुटबॉलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक 5 गोल करण्याचाही विक्रम होता.

त्याने त्याची पहिली हॅट्रिक इस्ट बंगाल विरुद्ध मोहन बगान यांच्यातील सामन्यादरम्यान नोंदवली होती.

Bhaichung Bhutia

भुतिया 1999 साली बरी एफसी क्लबमध्ये सामील झाला होता. त्यावेळी तो पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरलेला ज्याने एखाद्या युरोपियन क्लबबरोबर व्यावसायिक करार केला होता.

भुतिया भारताचा 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला फुटबॉलपटू आहे. त्याने 107 सामने खेळले आहेत. तसेच भुतियाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार 1995 आणि 2008 साली जिंकला होता.

Bhaichung Bhutia

इतकंच नाही, तर भुतिया सक्रिय फुटबॉल खेळाडू असतानाच त्याचे नाव स्टेडियमला देण्यात आले होते. त्याच्या नावाचे स्टेडियम सिक्कीममध्ये नामची शहरात आहे.

Bhaichung Bhutia

भुतियाला 2008 मध्ये अर्जून पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच 2014 साली त्याला भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

Goa Politics: 'मतदारांचा भाजप-मगो युतीलाच पाठिंबा'! आमदार आरोलकरांचा विश्वास; धारगळमधून हरमलकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

SCROLL FOR NEXT