Virat Kohli
Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: विराट पुन्हा 'आयसीसी'च्या टॉप टेनमध्ये; पाकविरुद्ध तडाखेबंद खेळीचा लाभ

गोमन्तक डिजिटल टीम

Virat Kohli: टी-20 क्रिकेट वर्ल्डकमपमध्ये रविवारी पाकिस्तानविरोधात झालेल्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 82 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता. या तडाखेबंद खेळीनंतर विराट पुन्हा आयसीसीच्या टॉप टेन रँकिंगमध्ये आला आहे.

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये विराट आता 635 पॉईंट्सह 9 व्या स्थानावर आला आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपुर्वी जेव्हा आशिया चषक सुरू होणार होता तेव्हा या क्रमवारीत विराट 35 व्या स्थानी होता. त्यानंतर अफगाणिस्तानविरोधात शतक ठोकून तो 15 व्या स्थानी आला. 2019 नंतर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकले नव्हते.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराटने भारताची अवस्था 4 बाद 31अशी असताना नाबाद 82 धावांची खेळी केली होती. त्याने हार्दिक पंड्यासोबत 113 धावांची भागीदारी केली होती.

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा शुन्यावर आऊट झाला होता. त्यामुळे त्याचे रँकिंगही घटले आहे. बाबर आता चौथ्या स्थानी आहे. या टॉप टेन विराटसह सूर्यकुमार यादवही आहे. सूर्यकुमार यादव याची एका क्रमाने गच्छंती झाली आहे. तो दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी आला आहे.

अशी आहे फलंदाजांची आयसीसी टी-२० क्रमवारी

खेळाडू रेटिंग

1) मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) 849

2) डिवोन कॉनवे (न्यूझीलंड) 831

3) सूर्यकुमार यादव (भारत) 828

4) बाबर आझम (पाकिस्तान) 799

5) एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका) 762

6) डेविड मलान (इंग्लंड) 752

7) अॅरन फिंच (ऑस्ट्रेलिया) 681

8) पथुन निसांका (श्रीलंका) 658

9) विराट कोहली (भारत) 635

10) मोहम्मद वसीम (संयुक्त अरब अमिरात) 626

या क्रमवारीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 16 व्या तर के. एल. राहुल 18 व्या स्थानी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : जनाधार कमी झाल्‍यानेच फळदेसाईंचे आरोप; सावित्री कवळेकर यांचा दावा

Siolim Water shortage : सागर उशाला; तरी कोरड पडलीय घशाला! आसगाव, शापोरावासीयांची व्यथा

Panaji News : पाटकर यांनी माफी मागावी; आमोणकरांची मागणी

Bicholim Factory Explosion : डिचोलीतील दुर्घटना; कारखान्यात सलग चार स्फोट

Video: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पुन्हा ओकली गरळ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT